Aawas Yojna
Aawas Yojna 
सोलापूर

पाच वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न लागला मार्गी ! करमाळा तालुक्‍यातील 1775 घरकुलांसाठी 24 कोटी निधी मंजूर 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करमाळा तालुक्‍यात 2020-21 या वर्षासाठी एकूण 1775 घरकुले मंजुर करण्यात आली असून, माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर घरकुलांसाठी 24 कोटी 85 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी सांगितले, की करमाळा पंचायत समितीच्या वतीने करमाळा तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर व्हावे म्हणून पात्र लाभार्थीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. तालुक्‍यातील गरजू लोकांचे प्रस्ताव मागवून जिल्हा परिषद सोलापूरकडे पाठवले. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, युवा नेते अजित तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून तालुक्‍यातील घरकुलांचे प्रस्ताव प्रलंबित होते. हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात यश आले आहे. चालू आर्थिक वर्षात हे घरकुल पूर्ण करण्यात येणार आहेत. करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती दत्ता सरडे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

मंजूर घरकुल, गावांचे नाव व कंसात मंजूर घरकुल संख्या 
आळजापूर (26), आळसुंदे (1), अंजनडोह (12), अर्जुननगर (42), आवाटी (31), भालेवाडी (4), भगतवाडी (15), भिलारवाडी (30), बिटरगाव (पा) (17), बिटरगाव श्री (3), बोरगाव (19), चिखलठाण (43), दहिगाव (6), देलवडी (10), देवीचामाळ (5), देवळाली (3), ढोकरी (10), दिलमेश्‍वर (15), गौंडरे (18), घोटी (39), गोयेगाव (13), गुळसडी(15), हिंगणी (4), हिसरे (61), हिवरे (2), जातेगाव (6), जेऊर (21), जेऊरवाडी (31), जिंती (4), कामोणे (8), कंदर (15), करंजे (4), कविटगाव (1), कावळवाडी (4), केडगाव (84), केम (11), केत्तूर (19), खडकी (39), खातगाव (8), कोंढारचिंचोली (9), कोंढेज (38), कोर्टी (38), कुगाव (8), कुंभारगाव (1), कुंभेज (13), मलवडी (10), मांगी (5), नेर्ले (16), निंबोरे (38), निमगाव (ह) (5), पाडळी (25), पांडे (28), पांगरे (19), पारेवाडी (19), पाथुर्डी (43), पिसरे (37), पिंपळवाडी (1), पोमलवाडी (12), पोंधवडी (21), पोफळज (15), पोटेगाव (4), पोथरे (80), पुनवर (4), राजुरी (31), रामवाडी (1), रिटेवाडी (3), रायगाव (22), रोशेवाडी (1), साडे (43), सालसे (13), सांगवी (3), सरपडोह (2), सातोली (1), सौंदे (4), सावडी (38), शेलगाव (क) (33), शेळगाव वांगी (14), शेटफळ (6), सोगाव (2), टाकळी (27), तरटगाव (2), उम्रड (24), उंदरगाव (12), वरकटणे (15), वरकुटे (3), विहाळ (7), वीट (24), वडगाव द (10), वाशिंबे (9), वांगी (85), वंजारवाडी (3), वडशिवणे (3), झरे (18). 

याबाबत पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे म्हणाले, करमाळा पंचायत समितीवर माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. करमाळा तालुक्‍याच्या विकासासाठी माजी आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या योजना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. भविष्यातील तालुक्‍याचा विकास पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT