सोलापूर

कोरोनाने बदलली अंतिम संस्काराची परिभाषा (VIDEO)

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : अंतिम संस्काराला नेतेवेळी किमान चारजणांचा खांदा असावा लागतो....अनेक वेळा रागाच्या भरात एखाद्याला उद्देशून तसे बोललेही जाते....जाताना चारजण असतील याची तरी दक्षता घे.. असेही म्हटल्याचे अनेकवेळा ऐकायला मिळते. मात्र कोरोनाने वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या चौघांच्या खांद्यावरून अंत्यसंस्काराला नेण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे.

अतिशय सुरक्षित किट परिधान केलेले दोन किंवा तीनजणच आता अंत्यसंस्काराचे सोपस्कार सोलापुरात पार पाडत आहेत. मरण पावलेली व्यक्ती कोणत्या धर्माची, जातीची आहे हाही प्रश्‍न नाही. एकूणच सारा प्रवास हा एकट्यानेच करायचा आहे, हेच कोरोनाने दाखवून दिले आहे. कोरोनाने मरण पावलेल्याचा मृतदेह पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास नातेवाइकांना काही अंतरावरून तो मृतदेह पाहण्याची सुविधा आहे. मात्र अंत्यसंस्कारावेळी कितीजण जायचे यासाठीही शासनाने बंधने घातली आहेत. बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला जाण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. अशावेळी शववाहिकेतून हा मृतदेह मोदी स्मशानभूमीत नेला जातो. सोबत नातेवाईक नाही, सगेसोयरे नाहीत, शासनाने कर्तव्यावर ठेवलेली माणसे असतात. मृतदेह बॉडीबॅगमध्ये पॅक केलेला, हुंदके देणारा कोणी नाही अशी स्थिती असते.

महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी नियुक्त केलेले लादेन शेख यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्या अनेकजणांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मरण पावल्यावर पोचवायला चारतरी माणसं लागतात असे बोलले जाते, मात्र आता तशी स्थिती राहिली नाही. आता दोघे-तिघेही पुरेसे आहेत. शववाहिकेतून मृतदेह आणला जातो, 
कोणत्याही प्रकारचे संस्कार नाहीत, विधी नाही, पाणी पाजणे किंवा विसावाही नाही. शववाहिकेतून थेट विद्युतदाहिनीत शव नेले जाते आणि काही सेकंदात अग्निसंस्कार होतात. 
आयुष्यभर लाखोंच्या गदारोळात जीवन जगले तरी शेवटच्या प्रवासाला एकट्यालाच जावे लागते, सारा प्रवास एकट्यानेच करावा लागतो हेच खरे. कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करता येत नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लादेन शेख यांच्याकडे अंत्यसंस्काराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.

कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराशी संवाद साधतेवेळी गहिवरून येते. बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयालाही क्वारंटाइनमध्ये राहावे लागते. त्याचा कालावधी संपायच्या आत कोणाचा मृत्यू झाला तर आपल्या जवळच्या माणसाची भेटही त्यांना घेता येत नाही. आयुष्यात वाईट अवस्थेतील अनेक मृतदेह पाहिले, पण सध्याची परिस्थिती भयानक आहे, असा अनुभव लादेन शेख यांनी सांगितला. 

कोरोनाने मृत्यू ;  अंत्यसंस्कारासाठी नियमावली 
कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी राज्य शासनाने नियमावली निश्‍चित केली आहे. त्यामध्ये मृतदेह घरी न नेता थेट स्मशानभूमीत न्यावा, यासह 42 मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. मृतदेहाच्या अंगावरील नळ्या व इतर साधने सुरक्षितरीत्या काढावी, नातेवाइकांच्या भावनांचा आदर ठेवून त्यांचे समुपदेशन करावे, मृतदेह बांधण्यासाठी नातेवाइकांची मदत घेऊ नये, मृतदेहाला अंघोळ घालणे, मिठी मारणे या प्रकारास बंदी असेल, या काही प्रमुख सूचनांचा समावेश आहे. 

कोरोनाने मृत्यू ;  अंत्यसंस्कार (VIDEO)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT