सोलापूर

गण गण गणात बोते: गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात होणार जंगी स्वागत

Gajanan Maharaj: दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे या पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur Latest News: बुलडाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होणार आहे.

दुपारी गंगेवाडी येथे या पालखीचे स्वागत करण्यात यणार आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे या पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम असणार आहे.

या पालखीत सातशेपेक्षा जास्त वारकरी घोडे, बॅंड पथकासह व वाहनांसह सहभागी होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होते. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचे स्वागत करण्यात येते.

दोन वर्षांपासून सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते या पालखीचे स्वागत परंपरा सुरू आहे. यंदाही ही परंपरा कायम राखण्यात येणार आहे.

आज पालखीचा मुक्काम उळेगावात असतो. येथे रात्री कीर्तन, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यानंतर उद्या बुधवारी (ता. १०) ही पालखी सोलापूर शहरात दाखल होईल. शहरात आगमन झाल्यानंतर पाणी गिरणी चौकात महापालिका प्रशासनातर्फे स्वागत करण्यात येणार आहे.

त्यानंतर तुळजापूर वेस, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक मार्गे प्रभाकर महाराज मंदिरात दुपारी १२ च्या सुमारास भोजन व विश्रांती होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता गजानन महाराजची पालखीचे सम्राट चौक, बाळीवेस, भुसार गल्ली मार्गे कन्ना चौक व त्यानंतर कुचन प्रशाला येथे १० जुलै रोजी मुक्कामी राहणार आहे.

उपलप मंगल कार्यालयात मुक्काम

११ जुलै रोजी सकाळी सहा वाजता ही पालखी जोडबसवण्णा चौक, पद्मशाली चौक, सिव्हील चौक, बेडरपूल, जगदंबा चौक मार्गे सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात मुक्कामी राहणार आहे.

त्यानंतर १२ जुलै रोजी उपलप मंगल कार्यालयातून मोदी पोलिस चौकी मार्गे जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, डॉ.आंबेडकर चौक मार्गे सकाळी ११ वाजता दमाणी नगर येथे भोजनासाठी थांबणार आहे. दमाणी नगरातील भोजन झाल्यानंतर महाराजांची पालखी तिऱ्हे मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT