Hit And Run Law Sakal
सोलापूर

Hit And Run Law : वाहन चालकाच्या गळ्यात चपलांचा हार; वळसंग टोलनाक्यावरील घटना; १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी टोलनाक्यावर संशयितांनी गैर कायद्याची मंडळी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) टोलनाक्यावर आंदोलनामध्ये सहभागी का होत नाही? म्हणून जमावाने गळ्यात चपलांचा हार घालून अब्रूनुकसानी, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल विठ्ठल बिराजदार यांनी फिर्याद दिली. बुधवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी टोलनाक्यावर संशयितांनी गैर कायद्याची मंडळी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

तसेच ट्रक (केए २१/एन ४३५३) अडवून चालकास तू आंदोलनात का सहभागी होत नाही, अशी विचारणा करीत त्यांचा पाणउतारा केला. तसेच त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून अब्रूनुकसानी केली. त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बसवराज चनबसप्पा अहिरसंग (रा. लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर), शरणबसप्पा गुरप्पा दुधगी (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर), लक्ष्मण तानाजी खटके (रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), रवी अण्णाप्पा फुलारी (रा. नीलम नगर, सोलापूर), सिद्धाराम शिवशरण ख्याडगी (रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), बसवराज शिवानंद रूकुम (रा.नीलम नगर, सोलापूर),

राहुल सिद्धाराम बिराजदार (रा. कुंभारी), संतोष यल्लप्पा इश्वरकट्टी (रा. शांतिनगर, सोलापूर), भूमेश बाळासाहेब हलगणे (रा. बोळकोटे नगर, सोलापूर), प्रशांत चंद्रकांत जम्मा (रा. शेळगी), वैभव नागनाथ कमटणकर (रा. मल्लिकार्जुन नगर सोलापूर),

श्रीशैल दानय्या हिरेमठ (रा. नीलम नगर), बाबूराव महादेव चांगले (रा. कुंभारी), महादेव नागेश जाधव (रा. नीलम नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Raina and Dhawan : मोठी बातमी! सुरेश रैना, शिखर धवनला ‘ED’चा दणका ; तब्बल ११.१४ कोटींची संपत्ती जप्त!

Stock Market Closing : आज शेअर बाजार लाल रंगात बंद! निफ्टी अन् सेन्सेक्स कितीवर? पाहा एका क्लिकमध्ये.

Sanjay Raut: '...हा आमच्या पिढीचा मंत्र होता'! हाताला सलाईन, पण बोटांमध्ये पेन धरलं; रुग्णालयातून संजय राऊतांकडून फोटो शेअर

Latest Marathi Live Update News : पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध बांगलादेशी महिला ताब्यात; मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू....

Margashirsha Month 2025: मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही करू नका हे काम! वाचा काय करावं आणि काय टाळावं

SCROLL FOR NEXT