Home Collapse by Gas Cylinder Blast Sakal
सोलापूर

Solapur News : गॅसच्या स्फोटाने घर कोसळले; दोन चिमुकल्यांसह चौघे जखमी

लहान मुलांसाठी दूध तापविण्याकरिता गॅस शेगडी पेटविताच सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घर कोसळले. या स्फोटात दोन चिमुकल्यांसह चौघे भाजून जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - लहान मुलांसाठी दूध तापविण्याकरिता गॅस शेगडी पेटविताच सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घर कोसळले. या स्फोटात दोन चिमुकल्यांसह चौघे भाजून जखमी झाले. गॅस गळतीमुळे सोमवारी (ता. २७) पहाटे साडेपाचच्या सुमारास हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही दुर्घटना घडली.

सोनाली माधुलिंग बोळुरे (वय २८), आरुषी माधुलिंग बोळुरे (वय ३), मलकारसिद्ध माधुलिंग बोळुरे (वय १ वर्ष) शावरसिद्ध सिद्धप्पा बोळुरे (वय ७०, सर्व रा. हत्तूर) अशी जखमींची नावे आहेत. पहाटे मुले रडायला लागल्याने सोनाली हिने गॅस पेटविला. मात्र, गळतीमुळे अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या झळा लागून घरातील चौघे जखमी झाले. तर आरसीसी घराच्या दारे, खिडक्या, भिंतींसह घर कोसळले. स्फोटाच्या आवाजाने गाव हादरले.

त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. बोळुरे यांच्या भावकीतील शिलसिद्ध बोळुरे यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त राजू मोरे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच एम. के. फाउंडेशनचे महादेव कोगनुरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन बोळुरे कुटुंबीयांची विचारपूस केली.

गर्भवती सोनालीला मानसिक धक्का

स्फोटात सोनाली ही चेहरा, दोन्ही हात, पाठीवर, आरुषी ही चेहरा, उजवा हात व पायाला, मलकारसिद्ध हा चेहरा, हात व पायास तर शावरसिद्ध हे चेहरा, दोन्ही हातास झळा लागल्याने जखमी झाले. सोनाली ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. या घटनेने तिला मानसिक धक्का बसला आहे. दुपारनंतर ती थोडी सावरल्याचे बोळुरे कुटुंबीयांनी सांगितले.

भिंत पडल्याने तीव्रता कमी

जखमी सोनाली यांचे पती माधुलिंग व सासू प्रातर्विधीसाठी बाहेर गेले होते. घरी मुले व सासऱ्यांसह चौघे होते. स्फोटाने त्याच्या झळा लागून चौघे जखमी झाले तर घराच्या पुढील भिंत जमीनदोस्त झाली. त्यामुळे झळा बाहेर पडल्याने त्यांची तीव्रता कमी झाली. भिंत पडताच घाबरलेले सोनाली व शावरसिद्ध हे जखमी अवस्थेतच दोन्ही चिमुकल्यांना घेऊन तातडीने घराबाहेर पडले. स्फोटाचा आवाज होताच माधुलिंग व त्यांच्या आई घटनास्थळी आले.

शासकीय मदतीची मागणी

बोळुरे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करताता. या स्फोटात त्यांचे घर पडले आहे. तर उर्वरित घराच्या स्लॅबसह भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. समोरील स्लॅबसह भिंती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत, इतकी या स्फोटाची तीव्रता होती. घर कोसळल्याने बोळुरे कुटुंबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT