gauri.jpg 
सोलापूर

पोलिस आणि डॉक्‍टरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या रुपात साकारली गौरी ! 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः कोरोना संकटात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्‍टर आणि पोलिसांच्या ऋणातून उतराई व्हावे, या भावनेने अभिमानश्री नगरातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस फौजदार शिवाजीराव पवार यांच्या कुटुंबियांनी पोलिस व डॉक्‍टरांच्या रुपात (गौरी) महालक्ष्मी साकारल्या आहेत. कोरोना संकटात सर्वांचे संरक्षण करणाऱ्या पोलिस व डॉक्‍टरांचा सन्मान करण्याचा सामाजिक संदेश या उत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. 

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शिवाजीराव पवार यांचे अभिमानश्री नगर भागात घर आहे. मागील वर्षीपासून हे कुटुंब गौरीच्या उत्सवाच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवते. कोरोना संकटामध्ये पोलिस व डॉक्‍टरांनी अत्यंत मोठी सेवा देऊन कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी थांबवली. तर डॉक्‍टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले. पोलिस व डॉक्‍टरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी याच रुपात साकारल्या. पोलिसांच्या वेशातील गौरीसाठी फेस शिल्ड संरक्षक ग्लास चेहऱ्यावर लावला आहे. डॉक्‍टर रुपातील गौरी देखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

महालक्ष्मी मखरात विशेष संदेश फलक लावण्यात आले आहेत. कोरोना आजारात मदत करणारे नर्स, डॉक्‍टर व पोलिसांचे आभार मानणारा फलक लावला आहे. मास्क हाच खरा दागिना असे सांगणारा फलक देखील पाहण्यास मिळतो. तसेच या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी रक्तदानाचे आवाहन करणारा फलक लावला आहे. मास्कशिवाय घरात परवानगी नाही, असा फलक घराच्या दर्शनी भागात लावलेला आहे. पांरपारिक मखरातील मांडणीच्या जोडूनच गौरीची वेगळ्या प्रकारची आरास केली आहे. या सोबत कोरोना संकटात काळजी कशी घ्यावी, याबाबत संदेश फलके लावून मखराची सजावट केली आहे. या सर्व सजावट व मांडणीचे काम पवार कुटुंबातील प्रशांत पवार व प्रसाद पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे. मागील वर्षी पवार कुटुंबियांनी चांद्रयानाची प्रतिकृती साकारली होती. दरवर्षी काही ना काही गौरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या कुटुंबाकडून केला जातो. ही आगळी वेगळी गौरीचे रूप पाहण्यासाठी नगरातील रहिवाशी आवर्जुन भेट देत आहेत. कोरोना जनजागृतीचा संदेश नगरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत या माध्यमातून पोहचू लागला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT