Mangalwedha BJP 
सोलापूर

विधानसभा पोटनिवडणुकीची हालचाल सुरू ! मंगळवेढा भाजप तालुकाध्यक्षपदी बुरकुल यांची निवड 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍यात राजकीय हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष भोगले यांची निवड करण्यात आली होती. त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष शहरातला व तालुकाध्यक्ष ग्रामीण भागातील असावा, असा सूर व्यक्त केला. याबाबत पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. परंतु, सध्या आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. शिवाय सध्या 22 ग्रामपंचायतींचा आखाडाही सुरू झाला आहे. तर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत परिचारक समर्थकांनी दामाजी कारखान्याची निवडणूक लढण्याचा निर्धार नुकताच व्यक्त केला. त्यानंतर तालुक्‍यामध्ये राजकीय हालचाली होण्यास सुरवात झाली आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने घेतली असून, सर्वसमावेशक चेहरा म्हणून गौरीशंकर बुरकुल यांना तालुकाध्यक्ष म्हणून निवडले. तर संतोष मोगले यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचा आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, युन्नूस शेख, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडेकर, अशोक माळी, अरुण किल्लेदार, नागेश डोंगरे, मधुकर चव्हाण, संतोष मोगले, बबलू सुतार व दीपक माने आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT