Marriage 
सोलापूर

साताऱ्याच्या मुलासोबत विवाह करणाऱ्या "त्या' तरुणीने यापूर्वीही केला होता विवाह ! 

तात्या लांडगे

सोलापूर : सातारा येथील युवकासोबत लग्न करून त्याच्या कुटुंबीयांची एक लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली. ते सर्वजण आता न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणातील वधू अन्नू सिकाटोल्लू हिचा यापूर्वीही कलबुर्गी येथील युवकासोबत विवाह झाल्याचे समोर आले आहे. तर कर्नाटकातील धनाजी पाटील याने अनेकांना अशा प्रकारचा गंडा घातल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.  

विवाहासाठी मुलीचा शोध घेणाऱ्यांचा शोध घेऊन विवाह जमविल्याप्रकरणी पैसे आणि विवाहानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी घातलेले दागिने घेऊन पसार होणाऱ्या काही प्रकरणात धनाजी पाटील याचा समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

साताऱ्यातील एका मुलाला लग्नासाठी शेळगी येथे मुलगी असल्याचे सांगून मध्यस्थी करणाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. विवाहानंतर गावी जाताना वधू व तिची मावशी पळून जाताना त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. आता पाचही संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तत्पूर्वी, अन्नू या मुलीचा कलबुर्गीतील एका मुलाशी विवाह झाला होता. त्यातही धनाजी पाटील हाच मध्यस्थी होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता पोलिसांनी पथके नियुक्‍त केली आहेत. तर अन्नूची मावशी ज्योत्स्ना व बिराजदार मावशी, सचिन पांडव हे अद्याप फरारच आहेत. बीड येथील वधू-वर सूचक मंडळ चालविणाऱ्या बापू ढवळेचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

तपासासाठी पथकांची नियुक्‍ती 
विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वधू अन्नू सिकाटोल्लू, दीपा जाधव, लालासाहेब पवार, पूजा उपाध्ये आणि धनाजी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्नूची मावशी ज्योत्स्ना व बिराजदार मावशी यांना अटक करण्यासाठी पोलिस सायबर क्राईमची मदत घेत आहेत. अन्नूने यापूर्वी कोणाशी विवाह केला होता, त्याच्या चौकशीसाठी पोलिसांचे पथक कर्नाटकात जाणार आहे. धनाजी पाटील याने ज्यांना फसविले, त्यांचीही माहिती घेतली जाणार आहे. तूर्तास बनावट विवाहातून पैसे कमावणारी ही टोळी असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT