Natak band padda.jpg 
सोलापूर

नाट्यगृहांच्या भाड्यात सवलत द्या : नाट्य परिषदेसह, नाट्य व्यवस्थापन संघाची मागणी 

अरविंद मोटे

सोलापूर : महाराष्ट्रातील नाट्यगृहे शासनाने विविध अटी आणि सूचना देवून सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यानुसार नाट्य निर्माते संघाच्या वतीने निर्णय घेवून नाटकाचा प्रयोग होत आहे नाट्यगृहातील 50 टक्केच प्रेक्षकांना परवानगी राहणार आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी नाट्य परिषदेसह, नाट्य व्यवस्थापन संघाच्यावतीने करण्यात आली आहे. 

लॉकडाऊन नंतर आता पुण्यामध्ये नाट्यप्रयोगाच्या तिकिट विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. 12 आणि 13 डिसेंबर रोजी यशवंतराव नाट्यगृह, बालगंधर्व आणि रामकृष्ण नाट्यगृह या ठिकाणी एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. आता सोलापुरमध्येही नाटकाचे प्रयोग करायचे आहेत. सोलापूरच्या महापौर तसेच पालिका आयुक्तांना भेटून नाट्यगृह लवकर सुरू करावे, तसेच भाडे कमी करावे आणि स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी सांगितले. यासदर्भांत नाट्य व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले की, सध्या सर्वात स्वस्त सभागृह पुणे शहरात उपलब्ध आहे. 

एके काळी सर्वात कमी खर्च सोलापूरच्या प्रयोगासाठी येत असे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी 75 टक्के भाडे सवलत द्यावी. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाचे भाडे 11 हजारावरून 2500 रुपयांवर आणले आहे. इतर शहरातील सभागृहांसाठी भाडे कमी करण्यात यावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. यासदर्भांत नाट्य व्यवस्थापन संघाचे कार्याध्यक्ष गिरीश महाजन यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये प्रत्येक प्रयोगासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते जरी ती परत मिळत असली तरी भाडे अधिक अनामत रक्कम ही प्रत्येक तारखेकरीता भरवी लागते. पूर्वी एकादा अनामत रक्कम भरली की वर्षभर तारखा बूक करता येत आता जितक्‍या दिवस सभागृह हवे आहे. तितकी अनामत रक्कम भरावी लागते यामुळे वितरकांना प्रयोग सुरू करणे अशक्‍य होते, याचाही महापौर आणि आयुक्तांनी विचार करावा. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT