सोलापूर

शाळांच्या लेखापरीक्षणास द्या स्थगिती; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी 

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्यातील शाळांचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात येणारे 2019-20 या वर्षाचे अंतर्गत लेखा परीक्षण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्थगित करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना निवेदनही दिले आहे. 

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात झपाट्याने कोरोना वाढत आहे. त्यामुळे शाळा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे कामकाज वर्क फ्रॉम होम सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2019-20 चे गट साधन केंद्र, समूह साधन केंद्र आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाने 21 ते 26 सप्टेंबरअखेर तालुकास्तरावर लेखापरीक्षण घेण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

शाळांचे लेखापरीक्षण तालुकास्तरावर घेतल्याने मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापक आणि शिक्षक एकत्रित येणार असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अनेक शिक्षकांना कोनाची लागणही झाली आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक पदभाराची जबाबदारी ही बहुतांश 50 वर्षेवरील शिक्षकांवर आहे. यातील अनेक शिक्षक आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच निर्माण होणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागातही कोरोनाच्या उपचारासाठी बेडसंख्या तसेच ऑक्‍सिजन सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने 21 सप्टेंबरला जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांचे लेखा परीक्षण स्थगित करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे, सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी दिली. यावेळी समितीचे संपर्कप्रमुख मो. बा. शेख, बसवराज गुरव, शिवानंद बिराजदार, राजन ढवण, दीपक वडवेराव, दयानंद चव्हाण उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT