सोलापूरः सोलापूरचे वैभव हे सिद्धरामेश्वराच्या कार्याने सिध्द झाले आहे. शहराचा इतिहास, सांस्कृतिक वैभव अधिक लोकापर्यंत जावे यासाठी साहित्याच्या माध्यमातून मोठे कार्य हाती घेण्याची गरज ज्येष्ठ संत साहित्य अभ्यासक प्रा. शे. दे.पसारकर यांनी व्यक्त केली.
येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या सभागृहात इतिहासअभ्यासक व लेखिका डॉ. लता अकलूजकर लिखित सोलापूरचे परंपरागत वतनदार देशमुख घराणे व शांता मरगूर लिखित चरित्र नायक या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
प्रा. पसारकर यांनी सांगितले की, सोलापूरला असलेला भव्य इतिहास हा लक्षात घेत त्यावर संशोधनाची आवश्यक्ता आहे. सिध्दरामेश्वरांची वचने नव्याने विस्तारित स्वरुपात लिखित व्हावीत. मराठी व कन्नड साहित्याचा अनुवाददेखील झाला पाहिजे. दोन्ही भाषांची घटना व शैली अत्यंत वेगळी आहे. तरीही सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात या दोन्ही भाषातील पुस्तकाचा अनुवाद होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
लेखिका शांता मरगूर यांनी किरीटेश्वरांचा काळ हा सिध्दरामेश्वरांच्या नंतरचा काळ आहे. मात्र ते सिध्दरामेश्वराचे निस्सिम भक्त होते. त्यामुळे त्यांना सिध्दरामेश्वरांचा आशिर्वाद होता. कन्नड भाषेत असलेल्या या चरित्राचा अनुवाद मराठीतील वाचकांना उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त निळकंठप्पा कोनापुरे होते. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सोमशेखर देशमुख, मनोज केळकर, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, सत्यव्रत नूलकर, प्रा. एम. एम. मस्के, नितीन अण्वेकर, सिद्धेश्वर बमणी, ऍड. आर. एस. पाटील, काशिनाथ दर्गोपाटील, बसवराज अष्टगी, गिरीश गोरनळ्ळी, महेश अंदेली, डॉ. अनिल सर्जे, राजशेखर बुरकुले, संतोष पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन काशिनाथ आकाशे यांनी केले, तर सहशिक्षक रविंद्र कबाडे यांनी आभार मानले.
सिद्धरामेश्वर, योगदंडाचा काल सारखाच
देशमुखांचा इतिहास अगदी बहामनी काळापासून आढळतो. सोलापूर परगण्यावर देशमुखांचा अंमल विजापूरच्या आदिलशाहीत कायम होता. यामध्ये अफजलखानाने एक पत्र देशमुखांना लिहिलेले आढळते. एक कारकून काही गडबड करून फरार झाल्यानंतर अफजलखानाने त्याचा शोध घेऊन त्यास संपवावे, असे या पत्रात म्हटले आहे. शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा योगदंडाच्या बाबत कॅनडामधील एका संस्थेने केलेल्या कालमापनामध्येदेखील शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा काल व योगदंडाचा काल सारखाच असल्याचे आढळल्याचे लेखिका डॉ. लता अकलूजकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.