The goat stealing vehicle was chased and caught hitting the woman in the car
The goat stealing vehicle was chased and caught hitting the woman in the car 
सोलापूर

शेळ्या चोरून नेहणारे वाहन पाठलाग करून पकडले; सुसाट गाडीची महिलेला धडक 

अश्‍पाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : शेळ्या चोरून चारचाकी गाडीतून पळून जाणाऱ्या चार चोरट्यांसह पाच लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल कामती पोलिसांनी ताब्यात घेतला. मात्र एक चोरटा गाडीतून उडी मारून पळून गेला. 
भोला उर्फ छोटा लाल्या काशिनाथ गायकवाड (वय 30), विनायक उर्फ विनोद सिद्राम जाधव (वय28), मारुती विलास जाधव (वय28) व भारत चंद्रकांत जाधव (वय 31, सर्व रा. सेटलमेंट, सलगर वस्ती, सोलापूर) या संशतिय आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील सोहाळे पाटीजवळ आज (ता. 17) दुपारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, अरबळी (ता. मोहोळ) भागातून चोरट्यांनी काही शेळ्या चोरून पांढऱ्या रंगाच्या गाडीतून (एमएच 45/ए 7622) पळवून नेल्याची माहिती कामती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी तात्काळ कामती, बेगमपूर, कुरुल, कोरवली येथे नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, सदर चोरीच्या शेळ्या घेऊन निघालेले वाहन सुसाट वेगाने येणकी मार्गावरून बेगमपूरकडे निघाले होते. या गाडीचा पोलिस व पोलिस मित्रांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, बेगमपूर येथे रस्त्याच्याकडेला भाजी विक्रेत्यांच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या एका महिलेला व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला धडक देत हे वाहन सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाले होते. यावेळी पोलिसांनी महामार्गावरील सोहाळे येथे मुख्य रस्त्यावर अन्य वाहनांचे टायर व लाकडे टाकून ती गाडी अडवून ताब्यात घेतली. यावेळी चोरून आणलेल्या तीन शेळ्या, दरोड्यासाठी वापरले जाणारी हत्यारे व चार जण पोलिसांच्या हाती लागले. परंतु एक चोरटा पळून गेला. पाच लाख किमतीचे वाहन व सुमारे पंधरा हजार किमतीच्या तीन शेळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. 
सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बबलू नाईकवाडी, महिबुब शेख, बापू दुधे, हेड कॉन्स्टेबल यशवंत कोटमळे, अमोल नायकोडे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. पवार, श्री. इंगळे, श्री. मसलखांब, श्री. माने यांनी ही कारवाई केली. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT