solapur collector
solapur collector 
सोलापूर

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालताच गोकूळ, लोकमंगल कारखाना झाले सरळ, सीताराम महाराज, सहकार शिरोमणी, भिमा कारखान्यावर कारवाईचे आदेश 

प्रमोद बोडके

सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगरकडे एफआरपीचे 1 कोटी 56 लाख रुपये शिल्लक आहेत. वाहतूक आणि कामगारांचेही देणी आहेत. या रकमा शेतकऱ्यांना 15 ऑक्‍टोबरपर्यंत देण्याचे कारखान्याचे सहायक व्यवस्थापक कार्तिक पाटील यांनी मान्य केले. भविष्य निर्वाह निधीच्या रकमाही त्वरित कामगारांच्या खात्यात जमा करण्याचेही श्री. पाटील यांनी मान्य केले. लोकमंगल शुगर भंडारकवठे आणि बीबीदारफळ कारखान्याने 15 हजार शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे दिले असून राहिलेल्या शेतकऱ्यांनाही पैसे देण्यात येतील, असे लोकमंगलच्या प्रतिनिधीने मान्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेताच हे दोन्ही कारखाने सरळ झाले आहेत. 

पंढरपूर तालुक्‍यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना आणि सीताराम सहकारी साखर कारखाना, पंढरपूर कारखान्यांच्या बाबतीत कारखान्याचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांची पैसे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. मोहोळ तालुक्‍यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2017-18 ची शेतकऱ्यांची थकबाकी त्वरित देण्याचे आदेशही श्री. शंभरकर यांनी दिले आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे (रास्त आणि किफायतशीर दर) साखर कारखानदारांनी पैसे देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला नसल्याने शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीप्रमाणे (महसूल पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र) जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. 

जिल्ह्यातील शेतकरी, विविध संघटना, कारखान्याचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे, प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त हेमंत तिरपुडे, कामगार सहआयुक्त निलेश यलगुंडे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, पंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, विशेष लेखापाल जी.व्ही. निकाळजे, के.ए. शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटना, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT