Gold biscuits. 
सोलापूर

पोलिसांची सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर मोठी कारवाई ! विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणारे तीन कोटींचे सोने जप्त 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणाऱ्या कारमधून तीन कोटी किमतीची सोन्याची बिस्किटे रविवारी (ता. 14) रात्री जप्त करण्यात आली. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. 

विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणाऱ्या कारमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती रविवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर संबंधित कार (डब्ल्यूबी 02 - एपी 1596) आली असता रात्री 10 वाजता पोलिसांनी ती अडवली. त्यात कारचालक व अन्य एकजण होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारण उत्तरे दिली नाही. गाडीत काहीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता चालकाच्या सीटखाली लॉकर असल्याचे आढळून आले. ते उघडून पाहिली असता त्यामध्ये एक किलोप्रमाणे सहा सोन्याची बिस्किटे मिळून आली. 

याबाबत चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ही बिस्कीटे आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा, संदीप काशीद, विजय भरले, श्रीकांत गायकवाड, लाला राठोड व बापू शिंदे यांनी केली. त्यांच्याकडून तस्करी होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळपर्यंत हे सोने चोरीचे आहे, की जीएसटी चुकवून नेले जात होते, याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे. याबाबत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT