Computer courses sakal
सोलापूर

महिला अन्‌ मुलींसाठी गूड न्यूज! महापालिका देणार ८ कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण

शहरातील हातावरील पोट असलेल्या मुली व महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात एमएससीआयटी, टॅली, बॅंकिंग, सोलापूर पॉवर सिस्टिम, फॅशन डिझायनिंग, लेडीज टेलरिंग, ब्यूटी पार्लर आणि कराटे या कोर्सेसचा समावेश आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शहरातील महिला व मुलींना (पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील) विविध ८ प्रकारचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १५) अर्ज करावा लागणार आहे.

शहरातील मुली व महिलांच्या हाताला काम मिळावे, हातावरील पोट असलेल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात एमएससीआयटी, टॅली, बॅंकिंग, सोलापूर पॉवर सिस्टिम, फॅशन डिझायनिंग, लेडीज टेलरिंग, ब्यूटी पार्लर आणि कराटे या कोर्सेसचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असणार आहे. त्यासाठी १४ ते ४५ वयोगटातील मुली- महिलांना सहभागी होता येणार आहे. बॅंकिंग कोर्ससाठी बारावी उत्तीर्ण, एमएससीआयटी, टॅली व फॅशन डिझायनिंगसाठी दहावी उत्तीर्णची अट आहे. तसेच सोलर पॉवर सिस्टिम, लेडीज टेलरिंग व कराटे, ब्यूटी पार्लर या कोर्सेससाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे. इच्छुक मुली व महिलांना www.solapurcorporation.gov.in यावर अर्ज करता येणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत पात्र उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या महिला व मुलींना महापालिका मोफत प्रशिक्षण देणार आहे.

जवळ असू द्या ‘ही’ कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा

  • वयोमर्यादेचा पुरावा

  • रेशनकार्ड

  • आधार कार्ड व स्वत:चा फोटो

शिक्षणाची अशी आहे अट

१४ ते ४५ वयोगटातील मुली- महिलांना सहभागी होता येणार आहे. बॅंकिंग कोर्ससाठी बारावी उत्तीर्ण, एमएससीआयटी, टॅली व फॅशन डिझायनिंगसाठी दहावी उत्तीर्णची अट आहे. तसेच सोलर पॉवर सिस्टिम, लेडीज टेलरिंग व कराटे, ब्यूटी पार्लर या कोर्सेससाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT