Accident 
सोलापूर

सुनेच्या माहेरगावी जत्रेतील मटण बेतले सासऱ्याच्या जिवावर ! दहिटणे येथे दुचाकीवरून पडून मृत्यू 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : सुनेच्या माहेरी गावी जत्रेत केलेले मटण खायला आलेल्या सासऱ्याचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (31 डिसेंबर) सायंकाळी चारच्या दरम्यान वैराग - मोहोळ रोडवरील दहिटणे येथील शिवाजी जाधव यांच्या शेताजवळ घडली. गोरख नारायण व्यवहारे (वय 65, रा. सुस्ते, ता. पंढरपूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे, की दहिटणे (ता. बार्शी) येथील ग्रामदैवत श्री चांगदेव पाटील देवस्थानची वार्षिक यात्रा गुरुवारी (31 डिसेंबर) होती. यात्रेत मटण, मासे असा बेत असल्याने पै - पाऊण्यांना आमंत्रणं दिली जात असल्याने गावातील मुला - मुलींच्याकडील पाहुणे मोठी गर्दी करतात. येथील नवनाथ दळवी यांची मुलगी मुलगी सुस्ते येथील गोरख व्यवहारे यांच्या मुलाला दिली होती. यात्रेत मटणाच्या बेताचे आमंत्रण व्यवहारे यांना मिळाल्याने सासरे गोरख व्यवहारे दुचाकीवरून गुरुवारी सकाळी सुस्ते (ता. पंढरपूर) येथून आले होते. 

मटणाचे जेवण म्हटल्यावर दारू पिण्याचाही बेत झाला. जेवणानंतर वैराग रोडवरून निघालेल्या गोरख व्यवहारे यांची दुचाकी घसरली. ते तोंडावर पडले. जोराचा मार लागल्याने कान - डोळे व तोंडातून मोठा रक्तस्राव झाला. जखमी झालेल्या गोरख व्यवहारे यांना पै - पाहुण्यांनी उपचारासाठी उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जत्रेच्या मटणाचा बेत जिवावर बेतला. ऐन जत्रेत दूरवरून आलेल्या पाहुण्याचा मृत्यू झाल्याने जत्रेवर शोककळा पसरली. मृत गोरख व्यवहारे यांचे मेव्हणे विष्णू काशीद, नवनाथ दळवी यांनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधत मृतदेह सुस्ते गावी हलवल्याचे पोलिस पाटील संदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT