Farmers 
सोलापूर

मोहोळ तालुक्‍यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा कोटी प्राप्त ! अडचणीत असलेल्या बारा गावांतील शेतकऱ्यांना दिलासा

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीपोटी तहसील कार्यालयाला तिसरा हप्ता म्हणून दहा कोटी रुपये प्राप्त झाले असून, ही रक्कम बारा गावांतील शेतकऱ्यांना वाटप केल्याची माहिती तहसीलदार बनसोडे यांनी दिली. आतापर्यंत एकूण 48 कोटी रुपये मोहोळ तालुक्‍याला प्राप्त झाले आहेत. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 14 व 15 ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सुमारे आठशे दुभती व इतर जनावरे वाहून गेली तर ऊस, केळी, मका या पिकांसह द्राक्ष, डाळिंब या फळबागांचे मोठे नुकसान झाले. जमिनीवरील माती खरडून गेली तर मोटारी व पाइपलाइन वाहून गेल्या. दरम्यान, तहसीलदार बनसोडे यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले होते. पंचनाम्याचा अहवाल येताच तालुक्‍याच्या नुकसान भरपाईचा सुमारे पंचावन्न कोटीचा आराखडा तयार करून शासनाला पाठविला. त्यापैकी आजपर्यंत 48 कोटी रुपये प्राप्त झाले, तर ज्या शेतकऱ्यांचे जादा नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाईचे तातडीने वाटप केले आहे. 

दरम्यान, तहसीलदार बनसोडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून दहा कोटी रुपये प्राप्त करून घेतले आहेत. त्याचे बारा गावांतील 11 हजार 620 शेतकऱ्यांना वाटप केले आहे. अद्यापही पेनूर मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. येत्या आठवडाभरात उर्वरित सात कोटी प्राप्त होतील, असेही तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले. 

गावनिहाय शेतकरी संख्या व त्यांना मिळालेली नुकसान भरपाई... 

  • शेटफळ : 1050 : 99 लाख 97 हजार 700 
  • सिद्धेवाडी : 222 : 21 लाख 82 हजार 550 
  • तेलंगवाडी : 645 : 79 लाख 28 हजार 250 
  • वाफळे : 730 : 72 लाख 79 हजार 750 
  • आष्टी : 1781 : 1 कोटी 48 लाख 2000 
  • बैरागवाडी : 756 : 83 लाख 11 हजार 400 
  • कुरणवाडी : 314 : 29 लाख 76 हजार 650 
  • येवती : 652 : 72 लाख 56 हजार 550 
  • यावली : 472 : 47 लाख 72 हजार 
  • टाकळी सिकंदर : 718 : 75 लाख 78 हजार 
  • वरकुटे : 432 : 42 लाख 76 हजार 
  • तांबोळे : 550 : 54 लाख 33 हजार 750 
  • पोखरापूर : 977 : 63 लाख 83 हजार 400 
  • कुरुल : 1648 : 1 कोटी 67 लाख 1605 
  • खुनेश्वर : 673 : 32 लाख 71 हजार 950 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : 'मातृभाषा शिकली पाहिजे, असं मोदी नेहमी म्हणतात'; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT