government should pay attention to problem of milk producing farmers Dr Deshmukh solapur Sakal
सोलापूर

Solapur News : दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारने लक्ष द्यावे - डॉ देशमुख

शेतकरी वर्गाचा अधार डॉ दत्तात्रय अर्जुन केले डॉ देशमुख केले कौतुक

संजय हेगडे

तिसंगी : शिरभावी ता सांगोला येथिल अर्जून उद्योग समुह व कृषीदत्त परिवार कडुन शिरभावी परिसरातील दुध उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड केली. यावेळी ट्रॉफी, बुलेट, सोने, शोकेस कपाट, टिव्ही, फवारणी पंप, शिलाई मशिन,

भांडी सेट, इलेक्ट्रिक इस्त्री(183000रू) बुलेट सोडुन आदीसह सर्व शेतकरी वर्गास रोख स्वरुपात डिव्हिडंट (177000 रू) वाटप तर कर्मचारी वर्गास दोन तोळे सोने देण्यात आल्याचे अर्जुन उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय अर्जुन, संचालिका मिनल अर्जुन, मयुर अर्जुन, मोसम अर्जुन परिवार सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शाहजी नलवडे, नागनाथ ढोले, दामोदर जगदाळे आदीसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी डॉ. बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. पावसाने तर दडी मारली आहे. सत्तेसाठी महाराष्ट्रात जनता वेठीष धरली जात आहे. शेतकर्यांच्या मालाला हमी भाव नाही.

अन्न, वस्त्र, निवारा प्रमुख गरजा आहेत पण या कडे राज्य सरकारचे लक्ष नाही. शिक्षण, आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. तर तरूणाच्या हाताला काम नाही. बेरोजगार तरूण उपाशी आहे. तर शेतकरी वर्गाचा अधार असलेले दुध आज कवडी मोल दराने घेतले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आज मितीस सात ते आठ रूपयेने दुधाचे दर कमी झाले आहेत.

दुधाला शासनाने 35 रू हमी भाव जाहीर केला असताना महाराष्ट्रातील दुध कंपन्या शेतकरी वर्गाचे शोसन करीत आहेत. तर बाहेरील राज्यातील दुध उत्पादक कंपनी मात्र शेतकरी वर्गास चांगला भाव देत आहेत. हा दुजा-भाव शासनाचे नियंत्रण नसल्याने चालु आहे.

दूध दर कमी केले पण सुग्रास चे दर मात्र वाढतच चालले आहेत. दुष्काळाने होरपळत चाललेल्या शेतकरी वर्गास न्याय देण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचे वतीने पुढील काळात केले जाईल असे मत अर्जुन उद्योग समुह शिरभावी शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. अर्जुन उद्योग समुहाने शेतकरी वर्गासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय अर्जुन यांचे कौतुक डॉ देशमुख यानी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT