GP 
सोलापूर

उपरीकरांना भोवली ग्रामपंचायत निवडणूक ! कोरोनाने काढले पुन्हा डोके वर; लॉकडाउनची शक्‍यता

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन न करता बिनदिक्कतपणे रात्रंदिवस केलेला प्रचार आता त्यांच्याच अंगलट आले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक झाली मात्र यामुळे गावात कोरोनाची साथ वाढल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये गावामध्ये कोरोनाचे तब्बल 25 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दरम्यान, येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाने आज कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पंढरपूर येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

उपरी येथील ग्रामपंचायतीची 15 जानेवारी रोजी निवडणूक पार पडली. स्थानिक राजकीय गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात राहावी यासाठी दोन्ही गटांनी सर्व राजकीय डावपेच आणि नीतीचा वापर केला होता. कोरोनाचे संकट असतानाही कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्‍यात घालून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रचारा दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासून कार्यकर्ते गल्लोगल्ली जाऊन प्रचार करत होते. 

याच दरम्यान मुंबई, पुणेसह राज्याच्या बाहेरूनही अनेक मतदार गावात आले होते. त्यांनीही कोरोनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यातूनच गावात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला. गेल्या दहा दिवसांमध्ये गावात 25 हून अधिक गामस्थांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक येथील ग्रामस्थांना चांगलीच भोवल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

यापूर्वी उपरी येथे तालुक्‍यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्या वेळी तालुक्‍यात एकच खळबळ उडाली होती. सध्या पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच उपरीत मात्र कोरोनाने डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. 
येथील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागासाठी चांगलीच डोकेदुखी ठरू लागली आहे. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात तीन दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT