Solapur Crime Sakal
सोलापूर

Solapur Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना आजोबांने केला नातीवर अत्याचार

करमाळा तालुक्यात 65 वर्षीय चुलत आजोबांनी अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याने नात गर्भवती राहिल्याची घटना उघड

आण्णा काळे

करमाळा : करमाळा तालुक्यात 65 वर्षीय चुलत आजोबांनी अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याने नात गर्भवती राहिल्याची घटना उघड झाली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तालुक्यात घडली.

याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. मे 2023 ते जुन 2023 या कालावधीत रहात्या घरी आजोबाने 13 वर्षीय नातीला गोड बोलुन तिच्यावर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले.सबंधित अल्पवयीन मुलीला दिवस गेले आहेत. दोन महिन्यापासून आजोबा नातीला गोड बोलून रहात्या घरी अत्याचार करत होता.

अत्याचारनंतर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतरही घटना उघड झाली आहे .याबाबत करमाळा पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवार ता. 28 रोजी संबंध संशयित संशयीताविरोधात बाल लैंगिक आत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करमाळा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने व नातेवाईकांनी करमाळा पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली त्यानंतर संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक देखील केली आहे.

मात्र चुलत आजोबाने अल्पवयीन 13 वर्षाच्या नातीवर गेली दोन महिन्यात वारंवार अत्याचार केले असून ही घटना नात्याला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT