Guaranteed Maize Purchase The amount received by the farmers of Pandharpur Sangola 
सोलापूर

हमीभाव मका खरेदी : पंढरपूर, सांगोल्यातील शेतकऱ्यांना मिळाली 'एवढी' रक्कम 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने हमीभाव मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. आजअखेर पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील सुमारे 346 शेतकऱ्यांची सुमारे 1 कोटी 63 लाख 68 हजार रुपये किंमतीची 9 हजार 300 क्विंटल मका खरेदी केली आहे. पहिल्या टप्प्यात खरेदी केलेल्या 1 हजार 164 क्विंटल मक्‍याचे 20 लाख 49 हजार 520 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंका खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शांतीनाथ बागल यांनी आज सकाळ शी बोलताना दिली. 
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांना शेतीचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पंढरपूर व सांगोला तालुक्‍यात मक्‍याचे चांगले उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी पंढरपूर व सांगोल तालुक्‍यासाठी पंढरपूर येथे मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. मागील महिन्यापासून मका खरेदी केंद्र सुरु आहे. आजअखेर 9 हजार 300 क्विंटल मक्‍याची 1 हजार 760 रुपये या हमी भावाने खरेदी केली आहे. आतापर्यंत सुमारे 346 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. 
सध्या बाजारात मक्‍याला 1 हजार 200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मका खरेदी केद्रामध्ये सध्याच्या बाजार भावा पेक्षा शेतकऱ्यांना 500 रुपये अधिक मिळत आहे. शेतकऱ्यांना 46 लाख 50 हजार रुपयांचा अधिकचा फायदा झाला आहे. 
17 जूनपासून येथील शासकीय धान्य गोदामात मक्‍याची खरेदी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात खरेदी केलेल्या 1 हजार 164 क्विंटल मक्‍याचे 20 लाख 49 हजार 520 रुपये संबंधीत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतील असेही त्यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT