Dhone 
सोलापूर

"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका !'

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यानंतर धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आपले उपोषण रात्री उशिरा मागे घेतले. 

अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, स्मारकाच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर करावी, तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी तरतूद करावी, या मागण्यांसाठी विक्रम ढोणे यांनी सोमवारी (ता. 25) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही ढोणे पोषणावर ठाम राहिले. सकाळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली, मात्र त्यात ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ढोणे यांनी उपोषण सुरूच ठेवले. दिवसभरात अनेकांनी उपोषणस्थली भेट देऊन पाठिंबा दिला. रात्री प्रशासनाने या प्रश्नी तोडगा काढण्याची भूमिका घेतली. त्यानुसार रात्री 11 वाजता पालकमंत्री दत्तात्रय भरणे व ढोणे यांची चर्चा विश्राम धाम येथे झाली. या वेळी "महिनाभरात स्मारकाची प्रक्रिया सुरू होईल. मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका', असे आश्‍वासन पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. 

याबाबत ढोणे यांनी सांगितले, की उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्मारकासाठी शासकीय निधी देण्याची घोषणा केली, त्याला पाच महिने झाले. मात्र पुढे काही घडले नाही. या विषयात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. तसे आवाहनही आम्ही केले होते. आता उपोषण केल्यानंतर त्यांनी महिनाभरात प्रक्रिया सुरू करू, असे ठोस आश्वासन दिले आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे घडावे, अशी इच्छा आहे. तसे घडले नाही तर पुन्हा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल. या प्रश्नाचा पाठपुरावा आम्ही कायम ठेवणार आहोत. 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT