3images_359.jpg 
सोलापूर

लॉकडाउनबाबत पालकमंत्र्यांचे मोठे वक्‍तव्य...वाचा नक्‍की काय म्हणाले पालकमंत्री

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवरुन आता चार हजारांपर्यंत वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर काही जिल्ह्यांत दहा-बारा दिवसांचा लॉकडाउन करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, सोलापूर शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्‍यात असून त्यासाठी नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. परंतु, लस आली म्हणून नारिकांनी बेफिकीर न राहता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. सध्या लॉकडाउनचा कोणताही विचार नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशी कोणतीही मागणीही करण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी 'सकाळ'शी बोलताना दिला.

...तर मंगल कार्यालय केले जाणार सील
राज्यातील कोरोनाचा वाढू लागलेला संसर्ग चिंताजनक असून या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 16) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या पार्श्‍वभूमीवर आता मंगल कार्यालय, शाळांसह ज्या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. अशा ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली जाणार आहे. विशेषत: मंगल कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली असून 50 पेक्षा अधिक लोक असल्यास ते मंगल कार्यालय सील करा, असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. तर नागरिकांनी एवढा त्रास सहन करीत कोरोनाला आवर घातला आहे. आणखी काही दिवस नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्‍चितपणे आपले शहर कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी व्यक्‍त केला आहे.

ग्रामीणमधील 40 हजार 29 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एक हजार 173 जणांचा मृत्यू झाला असून आता 267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 12 हजारांहून अधिक व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी अकरा हजार रुग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे शहरातील 647 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या साडेचारशेहून अधिक रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी हात साबण व पाण्याने नियमित स्वच्छ धुवावेत, मास्कचा नेहमी वापर करावा, इतरांपासून किमान सहा फुटांपर्यंत अंतर ठेवून बोलावे, आजार न लपविता वेळेत उपचार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

ठळक बाबी...

  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, असे कृत्य करु नका
  • लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा अथवा तसा कोणताही विचार नाही
  • नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत स्वच्छता राखावी
  • सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करु नये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी
  • नियमांचे उल्लंघन करु नये, अन्यथा घ्यावा लागतील कठोर निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT