Trucks-image-696x392.jpg 
सोलापूर

धक्‍कादायक ! लॉकडाऊनमध्ये सोलापूरच्या 11 जणांनी गाठले ग्वाल्हेर

प्रमोद बोडके


येळेगाव, गावडेवाडी, वांगी : वांगी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीतील पांगळे आणि खांडेकर यांच्या बेदाणा शेडवर काम करणारा मध्य प्रदेशातील तरुण ग्वाल्हेरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हा एकटाच युवक ग्वाल्हेरला गेला नसून त्याच्यासोबत काम करणारे 11 जण 31 मार्चला वांगीतून ग्वाल्हेरला गेल्याचे आज समोर आले आहे. लॉकडाउनमुळे वाहनांची सोय नसल्याने या 11 जणांनी बेदाणा शेड येथून गावडेवाडी-मनगोळी फाटा (वीटभट्टी) पुन्हा गावडेवाडी, कंदलगाव, कामतीपर्यंत पायी प्रवास केला. या कामगारांचा पायी प्रवास कामतीपर्यंत झाला की मोहोळपर्यंत याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. मोहोळ किंवा कामती येथून या कामगारांनी ट्रकमधून ग्वाल्हेर गाठल्याचे समोर येऊ लागले आहे. 

नाशिकला पुणेमार्गे गेले की करमाळामार्गे? याचा तपास सुरू ​


ग्वाल्हेरमध्ये तो कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती प्रशासनाला बुधवारी (ता. 8) दुपारी मिळाली. तत्पूर्वी त्या 11 जणांच्या ग्रुपमधील एका कामगाराने त्या युवकाला कोरोना झाल्याचे मुकादमाला व्हॉट्‌सऍप मेसेजद्वारे बुधवारी सकाळीच कळविले होते. मध्य प्रदेशातील 29 कामगारांना (सध्या वांगीत असलेले. हे कामगार सध्या आयसोलेशनमध्ये आहेत) मेसेजची माहिती मिळताच त्यांनी आमची तपासणी करा, तरच आम्ही काम करू असा तगादा लावला. तपासणी करून घेण्यासाठी कामगारांनी येळेगाव गाठले. मंद्रूप पोलिसांनी व जिल्हा प्रशासनाने या मेसेजची खातरजमा केली. ग्वाल्हेर प्रशासनाकडूनही कोरोना पॉझिटिव्हची माहिती आल्यानंतर बुधवारी दुपारी त्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेतले. वांगीतून ग्वाल्हेरला गेलेले ते 11 कामगार नाशिकमार्गेच गेले, ही माहिती पोलिसांकडे असून ते नाशिकला पुणेमार्गे गेले की करमाळामार्गे? याचा तपास सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीकडे मोबाईल नसल्याने त्याच्यासोबतच्या व्यक्तींकडून त्याच्या प्रवासाची माहिती प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. 

त्याचा 14 दिवसांचा कालावधी जिल्ह्यातच 


कोरोनाबाधित व्यक्तीचा 14 दिवसांचा कालावधी सोलापूर जिल्ह्यातच गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो या जिल्ह्यातच होता. दोन महिन्यांत त्याने मोहोळ तालुक्‍यातील काही गावांमध्ये बेदाणा शेडचे काम केले ओह. सोलापूर जिल्ह्यात अद्यापही कोरोनाबाधित व्यक्ती नसल्याने त्याला या जिल्ह्यात लागण होण्याची शक्‍यता कमीच आहे. प्रवासात त्याला लागण झाली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाने काढला असून हा निष्कर्ष जिल्ह्यासाठी दिलासादायक मानला जात आहे. 
महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

Latest Marathi News Live Update : सांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोड

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! आता सातारा जिल्ह्यातील 'या' भागातून सुसाट धावणार गाड्या; जयकुमार गोरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

SCROLL FOR NEXT