21husband_wife_0_0.jpg 
सोलापूर

बहिणीचे अनैतिक संबंध असल्याचे भावाला समजले ! भावाने त्या तरुणालाच संपविले

तात्या लांडगे

सोलापूर : बहिणीसोबत एका मुलाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती झाल्यानंतर तो त्या मुलावर चिडून होता. 23 मार्चपासून ती महिला माहेरीच राहत होती. त्यांच्या भेटीगाठी वाढल्याने त्या रागातून तिच्या भावाने नितीन नागनाथ उबाळे (वय 30 रा. भिम नगर, बुध्द विहारजवळ, शेळगी) याचा खून केला. विशाल उर्फ सायबा मोहन सुरवसे असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मयताच्या भावाने दिली फिर्याद... 

  • विशाल उर्फ सायबा मोहन सुरवसे याच्या बहिणीसोबत मयत नितीन उबाळे याचे होते अनैतिक संबंध 
  • संशयित आरोपी तथा त्या महिलेचा भाऊ विशाल सुरवसेला झाली होती अनैतिक संबंधाची माहिती 
  • विशाल हा चिडून होता, तो सातत्याने नितीनच्या घरासमोरून हेलपाटे मारायचा 
  • 26 मार्च रोजी रात्री साडेनऊ ते 27 मार्चच्या सकाळी साडेसहा या वेळेत शेळगी परिसरातील नागोबा मंदिर परिसरात नितीनचा झाला खून 
  • डोक्‍यात दगड मारून त्याला ठार मारल्याचा विशालवर संशय; मयताचा भाऊ परशुराम उबाळे यांनी दिली जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद 


शेळगी परिसरातील मित्र नगरातील सायबा सुरवसे याच्या बहिणीचे नितीन उबाळे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याबद्दल सायबला माहिती झाली आणि त्यानंतर तो माझ्या भावावर चिडून होता. त्याच्या घरासमोरून अनेकदा चकरा मारायचा. 26 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता भाऊ नितीन हा घरातून बाहेर पडला. त्यानंतर 27 मार्च रोजी (शनिवारी) त्याचा खून झाल्याचे समजले. शेळगीतील महालक्ष्मी सोसायटीमागील नागोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत नितीनच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. हा खून त्या महिलेचा भाऊ विशाल (सायबा) यानेच केला, अशी फिर्याद मयताचा भाऊ परशुराम उर्फ बाळासाहेब नागनाथ उबाळे यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. संशयित आरोपीनेच हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल बोराडे हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT