पत्नीचा छळ sakal media
सोलापूर

४३ वर्षीय विवाहितेचा छळ! माहेरून पैसे आण, नाहीतर खुलानामा दे म्हणून दमदाटी

‘तुझ्या माहेरच्यांनी विवाहात चांगला मानपान केला नाही, समीर हा सरकारी नोकरीला असल्याने हुंडा देणारे अनेकजण भेटले असते. आता माहेरून दहा लाख रुपये आण, नाहीतर खुलानामा देऊन घर सोडून जा’ असे म्हणून सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : ‘तुझ्या माहेरच्यांनी विवाहात चांगला मानपान केला नाही, समीर हा सरकारी नोकरीला असल्याने हुंडा देणारे अनेकजण भेटले असते. आता माहेरून दहा लाख रुपये आण, नाहीतर खुलानामा देऊन घर सोडून जा’ असे म्हणून सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहानंतर (१९९७ पासून) पती, सासू, नणंद अशा १५ जणांनी विवाहात मानपान न करता तुझ्या आई-वडिलांनी आमची फसवणूक केली असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद नसीम समीर पठाण (रा. शिवगंगा नगर भाग-३, नई जिंदगी) यांनी पोलिसांत दिली. तसेच आम्हाला आता स्वतंत्र घर, घरजागा घ्यायची आहे, तु तुझ्या वडिलांकडून दहा लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तुझी आई राहात असलेले घर आमच्या नावे कर किंवा जागेच्या किंमतीएवढी रक्कम आम्हाला आणू दे, नाहीतर खुलानामा देऊन घर सोडून जा म्हणून त्यांनी वारंवार दमदाटी केली. तु मुलांना घेऊन कोठेतरी निघून जा म्हणूनही त्यांनी दमदाटी केली. त्यांनी जबरदस्तीने सोन्याचे दागिने घेऊन शिवीगाळ केल्याचेही फिर्यादी नसीम पठाण यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पती समीर महेबूब पठाण, सासू रजिया महेबूब पठाण, नणंद महेरून मुल्ला व तिचा पती मौला मुल्ला, शबाना दुर्वेस, तिचा पती बाकरहुसेन दुर्वेस, दीर जाकीर पठाण, जमीर पठाण, दिराचा मुलगा सलमान पठाण, पतीच्या मामाचा मुलगा गुलामहुसेन करणकोट, मामाची मुले रहिम, सादिक, मुन्ना, ईस्माईल कादर शेख अशा १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार गुलचंद पवार तपास करीत आहेत.

माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ

घर, जागा, जमीन, घरजागा, वाहन, नवीन व्यवसायासाठी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा सासरच्यांकडून छळ केला जात असल्याच्या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर आर्थिक चणचणींचा सामना करणाऱ्यांच्या कुटुंबात त्याचे प्रमाण जास्त असल्याची स्थिती आहे. काही तक्रारींवर पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सुरक्षा कक्षाकडून यशस्वी तोडगा काढला. अनेकांचे तुटत असलेले संसार पुन्हा जोडले, पण बऱ्याच जणांनी आपापसात मिटवून घेतलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT