1crime_logo_913.jpg
1crime_logo_913.jpg 
सोलापूर

हवालदार यांना सख्या बहिणींच फसविले ! राहायला दिलेली जागा स्वत:च्याच नावावर केली

तात्या लांडगे

सोलापूर : बनावट आधारकार्ड बनवून खोट्या व्यक्‍तीला उभा करुन तिघांनी जागा हडप केली, अशी फिर्याद मोहम्मद सादिक हुसेन हवालदार (रा. गोविंद विलासमोर, गुलमोहर कॉलनी, पुणे) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सगीरा अकबरअली पिरजादे (बहिण), रियाज अकबरअली पिरजादे (भाचा), रईसा अल्ताफहुसेन पिरजादे (बहिण), रिजवान अल्ताफहुसेन पिरजादे (भाचा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

परस्पर प्लॉट विक्रीप्रकरणी आणखी एक गुन्हा
सोलापूर : प्लॉट विक्रीचा कोणताही अधिकार नसतानाही सायण्णा रामराव शागालोलू याने रेश्‍मा रविकांत कांबळे यांना प्लॉट विकला. त्यानंतर कांबळे यांनी राजेंद्र श्रावण जोगदंड आणि विक्रांत जोगदंड यांना प्लॉटची विक्री केली. त्यामुळे सायण्णाने अजय मच्छिंद्र मस्के व सुनिल होगाडे यांची फसवणूक केली. तर राजेंद्र व विक्रांत जोगदंड यांनी आता त्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेतला आहे. तत्पूर्वी, या जागेवर बांधकाम न करण्यासंदर्भात न्यायालयाने स्टे दिला आहे. तरीही बांधकाम करण्यात आल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची फिर्याद मस्के यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. आता सहायक पोलिस निरीक्षक श्री. कोल्हाळ हे पुढील तपास करीत आहेत.

हवालदार हे कामानिमित्त पुण्यात राहतात. त्यांनी सोलापुरातील त्यांच्या दोन बहिणींना त्यांची जागा राहण्यासाठी दिली. मात्र, त्यांनी विश्‍वास संपादन करुन चक्‍क सख्या भावालाच टोपी घातली. त्या दोघींनी आपल्या मुलांच्या मदतीने महापालिकेत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले. कब्जा पावती करारपत्र तयार करुन टॅक्‍स पावतीवर स्वत:चे नाव लावून घेतल्याचेही हवालदार यांनी पोलिसांना सांगितले. पुण्यात राहत असताल्याने याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी कागदपत्रे काढल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यांनी त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि दोन बहिणी आणि त्यांच्या दोन मुलांविरुध्द फिर्याद दिली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT