child crime_ 
सोलापूर

तो म्हणाला प्रेम करतेस की नाही अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील अल्पवयीन मुलगी ट्यूशनला जाताना तु माझ्यावर प्रेम करतेस की नाही, तू माझ्याशी का बोलत नाही म्हणून सोमनाथ नावाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ट्यूशनमधील शिक्षकाला हकीकत सांगितली मात्र, त्यांनी हाकूलन दिले. तर सोमनाथ नावाच्या तरुणाने त्याच्या तिघा मित्रांसमवेत येऊन तुझ्या मुलीला सोडणार नसल्याचे सांगत चाकूने हातावर वार केल्याची फिर्याद पिडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फौजचार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिध्देश्‍वर पेठेतील राकेश ससाणे यानेही अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्याबाबत पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. राकेश हा काहीच कामधंदा करीत नसून तो मुलीचा सारखा पाठलाग करतो. तिच्याकडे सतत वाईट नजरेने पाहतो, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तुमच्या मुलीला माझ्याशी बोलायला सांगा नाहीतर मी आत्महत्या करेन, अशी धमकीही त्याने दिल्याचे पिडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी राकेश सासणेविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भाडेकरू अन्‌ घर मालकांत वाद 
सोलापूर : भाड्याच्या घरात राहत असताना घर मालकाच्या मित्राला घर खाली करायला लावा. मला 11 महिन्यांचे ऍग्रिमेंट करून द्या, अशी मागणी फिर्यादी फरजाना जलाल शेख (रा. पूर्व मंगळवार पेठ, माणिक चौक) यांनी घर मालकाकडे केली. त्यानंतर मी ऍग्रिमेंट करून देणार नसल्याचे सांगत घर खाली करण्यास सांगितले. त्यानंतर घर आताच खाली कर नाहीतर बघून घेतो म्हणून धक्‍काबुक्‍की केली. तसेच घरातील साहित्याचे नुकसान केल्याची फिर्याद फरजाना शेख यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यानुसार घर मालक रमेश दीक्षित, शुभम रमेश दीक्षित (रा. शुक्रवार पेठ, माणिक चौक) आणि ऋषिकेश दत्तात्रय भोसले (रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT