pandharpur.jpg 
सोलापूर

हरिनामाच्या जयघोषात पुष्पवृष्टी करत त्यांना दिला डिसचार्ज

अभय जोशी


पंढरपूर(सोलापूर) ः पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील सात व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी पाच व्यक्ती आता बऱ्या झाल्या मुळे हरिनामाच्या जयघोषात आणि पुष्पवृष्टी करत त्यांना आज वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला. 

उर्वरित दोन पैकी गोपाळपूर येथील रुग्णाला देखील सोलापूर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्‍याचा आज मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा जवान आणि आणि उजनी मधील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या एकूण बारा जणांचे आज स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. 
पंढरपूर शहरातील दोन आणि तालुक्‍यातील पाच व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या सात पैकी पाच जणांना तालुक्‍यातील वाखरी येथील एमआयटी मधील कोव्हिड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. पाच ही लोकांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला होता. 
त्यानुसार आज सकाळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्‍टर सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या उपस्थितित हरिनामाच्या जयघोषात आणि फुलांच्या वर्षावात पाचही व्यक्तींना घरी सोडण्यात आले. 

बार्डी आणि गोपाळपुर येथील प्रत्येकी एक अशा उर्वरित दोन व्यक्तींवर सोलापूर येथे उपचार सुरू होते. त्यापैकी गोपाळपुरच्या व्यक्तीस डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर एकनाथ बोधले यांनी दिली. 
दरम्यान मुंबई येथून कुर्डुवाडी येथे बंदोबस्तासाठी आलेल्या सहा रेल्वे सुरक्षा जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. हे सर्व जवान तीन जूनच्या सुमारास पंढरपूर येथे रेल्वेस्थानकावर बंदोबस्तासाठी आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या 29 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 
मुंबई येथून कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समजताच त्यांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग घेण्यात आले. तीन जूनच्या सुमारास हे जवान पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. ही माहिती समजताच येथील शासकीय यंत्रणा सतर्क झाली. संबंधित जवानांच्या संपर्कात आलेल्या 29 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या 29 जणांच्या पैकी आठ व्यक्तींचे स्वॅब आज घेण्यात आले. 
उजनी कार्यालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याचा तो पंढरपूर येथून लातूर येथे गेल्यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित अधिकारी 3 जून रोजी पंढरपूर येथे आले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या उजनी कार्यालयातील चार जणांचे स्वॅब देखील आज घेण्यात आले आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT