cash 
सोलापूर

पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांच्या विरोधात पोलिसांत देणार तक्रार 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांना खरिपासाठी मुबलक बियाणे, खते व पीक कर्ज देण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्यातील बॅंकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे यासाठी उद्दिष्ठ देण्यात आले आहे. ज्या बॅंका उद्दिष्ठानूसार पीक कर्जाचे वाटप करणार नाहीत त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिली. 

सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बॅंकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. पण बॅंका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविरुध्द पोलिस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तक्रार नोंदविण्याची कारवाई केली जाईल, असे श्री शंभरकर यांनी सांगितले. 

सोलापूरच्या पीक कर्जवाटपाबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले, खरीप हंगाम सुरू होऊन सुमारे एक महिना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यास एकूण 1 हजार 438 कोटी 52 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 30 जूनअखेर 648 कोटी 88 लाख रुपयाचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जूनअखेर पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 45 टक्केच वाटप झाले आहे. हे वाटप जास्तीत जास्त व्हावे, यासाठी बॅंकांकडे पाठपुरावा केला जात आहे. 

जिल्ह्यातील पीक कर्ज वितरण 
कर्जवाटप तपशील    राष्ट्रीयकृत बॅंका       खासगी बॅंका   जिल्हा बॅंक   व्हीकेजीबी 
बॅंकांच्या शाखा          233                     59                208            35 
खातेदार उद्दिष्ट         69505                 10605           22081        7281 
कर्ज वाटप उद्दिष्ट      105969               18286           15457        4140 
जून अखेर कर्जवाटप  27544.03             21128.1        13738.35     2478.09 
उद्दिष्टांची टक्केवारी     25.99                  115.54          88.88            59.86 
(खातेदार संख्या प्रत्यक्ष आणि आकडे लाख रुपयांत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : - घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', कारण काय?

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT