Mucomycosis
Mucomycosis Media Gallery
सोलापूर

पालकमंत्री म्हणाले, घरोघरी जाऊन म्युकरमायकोसिसचा सर्व्हे करा !

तात्या लांडगे

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांचा घरोघरी जाऊन सर्व्हे करावा, असे निर्देश काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिले.

सोलापूर : शहर-जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे (Mucomycosis) 346 रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे त्यापैकी 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. 1) 14 रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. शहरात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण 8 मे रोजी आढळला. तो रुग्ण कोरोनातून (Covid-19) बरा होऊन घरी गेलेला होता. त्याच्यावर 24 हून अधिक दिवस उपचार झाले होते. आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील एकूण एक लाख 42 हजार 410 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये शहरातील 26 हजार 402 तर ग्रामीणमधील एक लाख 16 हजार आठ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर खूप दिवस ऑक्‍सिजन (Oxigen), व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या विशेषत: मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने यापूर्वीच नोंदविले आहे. (Health officials in Solapur are conducting a survey of mucormycosis over the phone)

या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांचा घरोघरी जाऊन सर्व्हे करावा. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिले. 1 जूनपासून या मोहिमेला सुरवात होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे निर्देश बाजूला ठेवून मधुमेह असलेल्या रुग्णांशी फोनवरूनच संपर्क साधण्याचे काम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामीणमध्ये अजूनही सर्वत्र या मोहिमेला सुरवात झालेली नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होत असतानाच आगामी काळात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

रुग्णांची सद्य:स्थिती

  • एकूण रुग्ण : 346

  • बरे झालेले रुग्ण : 108

  • उपचार घेणारे रुग्ण : 213

  • मृत्यू : 25

प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांसाठी बेड्‌स

जिल्ह्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून नऊ ग्रामीण रुग्णालये आणि तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी या ठिकाणांची पाहणी करून किती खाटा तिथे बसू शकतात, याचा अंदाज घेतला जात आहे. उपचारासाठी त्याठिकाणी कोणकोणती साधनसामग्री नाही, त्याचा आढावा घेण्यात आला असून त्याचा कृती आराखडा तयार केला जात आहे. अंदाजित दोनशे कोटींपर्यंत त्यासाठी खर्च अपेक्षित असून या शासकीय रुग्णालयांमध्ये सुमारे अडीचशे बेड उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT