jaysiddeswahr-maharaj 
सोलापूर

खासदारांच्या याचिकेवर 13 मार्चला सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेवर सोमवारी (ता. 2) सुनावणी पार पडली. त्याचवेळी तहसिलदारांनी दाखल केलेल्या सोलापूर न्यायालयातील याचिकेवरही सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने डॉ. महास्वामी यांच्या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकून घेतला. 7 मार्चपर्यंत प्रतिवाद्यांना नोटीस बजावावी, या प्रकरणावर पुढील सुनावणी 13 मार्चला होईल, असे स्पष्ट केले. 


जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट येथील तहसिलदारांनी खासदार डॉ. महास्वामी यांच्याविरुध्द सोलापूर न्यायालयात फिर्याद दिली नसल्यास ती देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगितले. परंतु, तहसिलदार श्री. सिरसाट यांनी फिर्याद दिल्याने त्यावर रितसर कार्यवाही व्हावी, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी शुक्रवारी (ता. 13) सुनावणी होईल. तत्पूर्वी, प्रतिवाद्यांना 7 मार्चपर्यंत नोटीस बजावावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. खासदार डॉ. महास्वामी यांच्यातर्फे ऍड. संतोष न्हावकर,ख ऍड. ढाकेफाळकर, ऍड. अनुप पाटील काम पाहत आहेत. 


बुधवारी सोलापूर न्यायालयात सुनावणी 
लोकसभा निवडणुकीचा अर्ज करताना डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी जातीचा बनावट दाखला दिला. बनावट दाखला तयार केल्याप्रकरणी अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांनी सोमवारी (ता. 2) सोलापूर जिल्हा न्यायालयात रितसर खासगी फिर्याद दाखल केली. त्यावर 4 फेब्रुवारी रोजी प्रथम आदेश होणार आहे. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्कलकोटच्या तहसिलदारांनी मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन- देसरडा यांच्या न्यायालयात खासदार डॉ. महास्वामींविरोधात फिर्याद दाखल केली. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 11, फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी ही फिर्याद दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT