Rain Sakal
सोलापूर

अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस

विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : हवामान खात्याच्या 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडेल याचा हवामान अंदाज 20 व 21 तारखेस थोडासा फोल ठरला पण 22 तारखेस सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात पूर्ण पावसाळ्यात कमी अधिक पाऊस सतत होत गेला परिणामी कुरनुर धरण व पाझर व साठवण तलाव तसेच ओढे व नाले खळाळून वाहिल्याचे दिसून आले.तालुक्‍यातील 70 टक्के भाग म्हणजे 9 पैकी 6 मंडळे अधिक पावसासाठी तहानलेली दिसली.नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग एक जोरदार पाऊस होण्याची वाट पाहत होता.समर्थ नगरच्या पुढे पाऊस सरकत नव्हता पण आज दोड्याळ,जेऊर,करजगी,अक्कलकोट स्टेशन,नाविंदगी,नागणसुर,गौडगाव बनजगोळ ,कडबगाव,सलगर आदी भागात सायंकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेले पहावयास मिळाले. खरीप हंगाम अर्धवट पावसाने 75 टक्के वाया गेलेले होते.जेऊर परिसरातील विहीर पाणी पातळी कमी झालेली आहे तसेच रब्बी पेरणीसाठी पावसाची नितांत गरज होती ती आजच्या पावसाने पूर्ण झाली आहे.आता आणखी दोन दिवस पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे नेमके याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

आजपर्यंत झालेला पाऊस बाहेरचे आकडे आजचे तर कंसातील आकडे आजपर्यंत झालेल्या विविध मंडळातील पावसाचे आहेत

  • अक्कलकोट : 03 (342) चपळगाव : 00 (223)

  • वागदरी : 00 (292)

  • किणी : 00 (163)

  • मैंदर्गी : 04 (138)

  • दुधनी : 08 (203)

  • जेऊर : 04 (173)

  • करजगी : 00 (180)

  • तडवळ : 00 (165)

सरासरी पाऊस एकूण अक्कलकोट तालुका :

  • आजचा पाऊस : 02.11 मिमी

  • एकूण पाऊस : 208.77 मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT