Nests 
सोलापूर

पक्ष्यांच्या घरट्यांत तर कुठं खोप्यांत शिरलं पाणी ! अतिवृष्टीचा फटका पशू-पक्ष्यांनाही 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : अतिवृष्टीचा फटका माणसांबरोबरच पशू- पक्ष्यांनाही बसला असून, कुठं नदी - ओढ्याकाठच्या घरांत, तर कुठं पक्ष्यांच्या खोप्यांतही पाणी शिरलं आहे. यामुळे स्थलांतर करून पुन्हा नव्याने घरट्यांच्या वसाहती उभारण्याचं काम पक्ष्यांनी सुरू केले आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी चक्री वादळामुळे आलेलं महापुराचं संकट माणसांबरोबरच जनावरं आणि पशू - पक्ष्यांच्या अधिवासात आणि विहिरींजवळील झाडांच्या फांद्यांना, विहिरीत लोंबणाऱ्या सुगरणीच्या खोप्यांतही पाणी शिरल्याने या पक्ष्यांच्या वस्त्या उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. सलग तीन - चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे नद्या, ओढे, नाले, तळी तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सर्व लघू, मध्यम प्रकल्प भरून वाहत आहेत. भूगर्भातील पाणी पातळी कमालीची वाढली असून अनेक विहिरी तुडूंब भरून वाहत आहेत. पाणी पातळी वाढल्याने विहिरींच्या काठावर असलेल्या कडुनिंब, बाभूळ, पिंपळ, उंबर या झाडांच्या फांद्यांच्या टोकाला सुगरण पक्ष्याने केलेल्या घरट्यांत पाणी शिरले आहे. विणीचा हंगाम असल्याने सुगरण पक्ष्यांनी पुन्हा उंचावर घरटी बांधायला सुरवात केली आहे. 

एकूणच, अतिवृष्टीमुळे माणसांबरोबरच पशू - पक्ष्यांनाही मोठा फटका बसला असून, पक्ष्यांचे घरटे उद्‌ध्वस्त झाल्याने पक्ष्यांनी पुन:श्‍च घरटी बांधायला प्रारंभ केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT