heavy vehicle transport accident three black spot traffic police administration Sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूर शहरात वाढले तीन ‘ब्लॅक स्पॉट’; जुना बोरामणी नाक्याची अपघात प्रवण क्षेत्रात भर

शहर वाहतूक नियंत्रण विभागाने नुकताच शहरातील अपघात प्रवण क्षेत्राचा आढावा घेतला. यामध्ये शहरात तीन ब्लॅक स्पॉट वाढल्याचे निदर्शनास आले.

सकाळ वृत्तसेवा

- प्रमिला चोरगी

Solapur News : शहरातील ६० टक्के वाहतूक रिंगरोडमार्गे वळविण्यात आली. त्यामुळे जडवाहतुकीमुळे होणारे अपघात कमी वाटत असले तरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या रचनेमुळे अपघातात मृत्यू पावणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षात विव्हको प्रोसेस कंपनीजवळ, महालक्ष्मी मंदिर चौक, जुना बोरामणी नाका या तीन अपघात प्रवण क्षेत्रात नव्याने वाढ झाली आहे.

शहर वाहतूक नियंत्रण विभागाने नुकताच शहरातील अपघात प्रवण क्षेत्राचा आढावा घेतला. यामध्ये शहरात तीन ब्लॅक स्पॉट वाढल्याचे निदर्शनास आले. आजमितीला शहरात एकूण १८ ब्लॅक स्पॉट आहेत. त्यात नव्याने तीन ब्लॅक स्पॉटची वाढ होऊन २१ ब्लॅक स्पॉट झाले आहेत. शहराला वळसा घालून जाण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रिंगरोड अस्तित्वात आले.

त्यामुळे शहरातून जाणारी ६० टक्के जडवाहतूक या बाह्यवळणामुळे कमी झाली. त्यामुळे होटगी रोड, विजापूर रोड आणि हैदराबाद रोड या तीन मार्गावरील छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण कमी झाले. मात्र शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसणे.

एखादा अपघात झाल्यानंतर पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही न करणे, नियमबाह्य गतीरोधक, रस्ते दुरुस्ती, नो पार्किंग झोनकडे दुर्लक्ष आदींमुळे ब्लॅक स्पॉटच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर ठिकाणी वाहने चालविताना नागरिकांनी वाहने सावकाश चालवावीत तसेच सर्व सिग्नलचे पालन करण्याची गरज आहे.

या मार्गावर काळजी घ्यावीच

बाळे ब्रीज, मार्केट यार्ड, केगाव ब्रीज, मडके वस्ती, हिप्परगा ब्रीज, डी मार्ट, शिवाजी चौक, जुना पुना नाका या परिसरातून जाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. शहरातील १८ ब्लॅकस्पॉटपैकी सर्वाधिक अपघात अन॒ मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना काळजी घ्यावी.

नव्याने वाढलेले तीन ब्लॅक स्पॉट

  • विव्हको प्रोसेस

  • महालक्ष्मी मंदिर

  • जुना बोरामणी नाका

कमी झालेले दोन ब्लॅक स्पॉट

  • हत्तूर क्रॉस रोड

  • शांती चौक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Triple Murder Case: RSS नेत्याच्या तिहेरी हत्याकांडाचा थरारक Video; मुलानंतर वडिलांवर गोळीबार, मॅगझिन बदलून पुन्हा झाडल्या गोळ्या

Solapur District Bank: ‘सोसायटी’त ३ आमदारांसह ४ माजी आमदार रिंगणात; १० तालुक्यांतील उमेदवार निश्चित, माळशिरसचा तिढा कायम

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Marathi News Live Updates : प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत

Mumbai High Court: बारा वर्षे विभक्त राहणे हा छळच! घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT