akkalkot.jpeg 
सोलापूर

कट्टीमनी यांच्याकडून हसापूरच्या जळीत कुटुंबाला मदत 

सकाळवृत्तसेवा

अक्कलकोट : हसापूर (ता.अक्कलकोट) येथील नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनेमुळे दुपारगुडे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले होते. त्यांची परिस्थिती पाहून दलितमित्र हणमंतराव कट्टीमनी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव नागणसूर जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी गुरुवारी सायंकाळी दीक्षित दुपारगुडे यांच्या घरी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व संसारोपयोगी सर्व भांडी व वस्तू दिल्या. 

हसापूर (ता.अक्कलकोट) येथील नुकत्याच झालेल्या सोमनाथ दुपारगुडे यांच्या घराला अचानकपणे 
लागलेल्या आगीत पुर्णपणे घर जळून भस्मसात झाले आहे. त्यात जवळपास 6 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला. ही घटना 5 डिसेंबर रोजी 8 रात्री वाजता घडली होती. आगीमुळे बाधित झालेल्या दुपारगुडे कुटुंबीयांना कट्टीमनी यांच्याकडून मदत देण्यात आली. 

यावेळी बोलताना सरपंच अमोल स्वामी यांनी म्हणाले की, माणुसकीचे नाते जपत महांतेश्वर कट्टीमनी यांनी कठीणप्रसंगी केलेली मदत ही अनमोल आहे, असे सांगून दुपारगुडे कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी काही जणांनी मदत केली. दुपारगुडे कुटुंबीयांना अजून देखील मदतीचे गरज आहे, तरी इच्छुकांनी स्वत:हून मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन सरपंच अमोल स्वामी यांनी केले. 

यावेळी पत्रकार रविकांत धनशेट्टी, दिक्षीत दुपारगुडे, माजी उपसरपंच सागर घटकांबळे, अमोल घटकांबळे, गौतम घटकांबळे, श्रीकांत कांबळे, दुपारगुडे कुटुंबसहित हसापूर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT