The help of Police in Solapur District 
सोलापूर

बाहेर पडू नका म्हणून दटावणारा पोटासाठी धावून आल्याने त्यांचेही डोळे पाणावले 

सकाळ वृत्तसेवा

करकंब (सोलापूर) : 15 दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांसाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून रस्त्यावर उतरून "ऑन ड्युटी' निभावणाऱ्या खाकी वर्दीतील मायेची ऊब आज टेंभुर्णी (ता. माढा) येथील मजुरांनी अनुभवली. 
टेंभुर्णी येथील गणेश शिंदे हे गेल्या चार वर्षांपासून करकंब पोलिस ठाण्यात सेवा बजावत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दररोज घरातून ड्युटीसाठी बाहेर पडताना त्यांची आई डोळ्यात अश्रू आणून काळजी घेण्यास सांगत असते. त्यातच सर्वत्र शुकशुकाट असताना हातावर पोट असणारी कुटुंबे मात्र कोणीतरी मदत करेल, या आशेने रस्त्याकडे डोळे लावून बसलेली असतात, हे शिंदे यांनी स्वतः पाहिले. अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी त्यांचा जीव तुटायचा, पण ते हतबल असायचे. लॉकडाउनच्या काळात यांचे पोट कसे भरणार, या विचाराने ते व्यथित व्हायचे. अखेर आज (बुधवार) 1एप्रिल हा त्यांचा वाढदिवस आणि साप्ताहिक सुटीचा दिवस असूनही ते अंगावर खाकी वर्दी चढवून स्वतःचा मुलगा पृथ्वीराज आणि मुलगी कार्तिकी यांना घेऊन घराबाहेर पडले. दोन क्विंटल गहू, दोन क्विंटल साखर, दोन क्विंटल तांदूळ, बिस्किटाचे काही बॉक्‍स खरेदी केले आणि थेट मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या पालावर जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे तेथील मजूरही खाकीतील अशी अनोखी माणुसकी बघून अचंबित झाले होते. एरवी बाहेर पडू नका म्हणून दटावणारी खाकी वर्दीच आज पोटासाठी धावून आल्याने त्यांचेही डोळे पाणावले होते. श्री. शिंदे यांनी फक्त मजुरांनाच मदत केली असे नाही तर स्वतःच्या दोन मुलांवरही कृतीतून संस्कार केले. 

मनावरचे ओझे हलके 
ड्युटी करताना हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल बघून खूप वाईट वाटायचे. पण त्यावेळी काहीच मदत करता येत नसे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना काही प्रमाणात मदत केल्यामुळे मनावरील ओझे हलके झाल्यासारखे वाटतेय. 
- गणेश शिंदे, पोलिस नाईक, करकंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT