The help of Youth in Solapur city police 
सोलापूर

पोलिसांच्या मदतीला युवकांची फौज

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये नागरिकांच्या सेवेत दिवसरात्र पोलिस कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आता त्यांच्या मदतीला युवकांची फौज रस्त्यावर उतरली असून, त्यांच्यामुळे पोलिसांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
संचारबंदी, नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन येथील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे. बाहेरून पोलिसांची अतिरिक्त तुकडी मागवण्यापेक्षा पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार, ज्या स्थानिक युवकांना सामाजिक कार्याची आवड आहे, त्यांची निवड 'विशेष पोलिस अधिकारी' म्हणून करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत 60 -70 युवक नेमण्यात आले आहेत. जवळपास सर्व युवक उच्चशिक्षित असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. दररोज सहा ते आठ तास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेमून दिलेले कार्य हे पोलिस मित्र पार पाडत आहेत. प्रत्येक युवकाला पोलिस स्टेशनमधून सुरक्षिततेसाठी मास्क, टोपी, शिटी, सॅनिटायझर, काठी व टी-शर्ट देण्यात आले आहेत.

सोलापुरातील सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हे कार्य करताहेत विशेष पोलिस अधिकारी

काही विशेष पोलिस अधिकारी सकाळी मार्केट यार्ड व भाजी मंडई परिसरात लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत आवाहन करीत आहेत. कंटेन्मेंट झोनच्या सील केलेल्या बॅरिकेड्‌सजवळ थांबून बाहेरील लोकांना आत व आतल्या लोकांना बाहेर जाण्यास प्रतिबंध करीत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसोबत राऊंडवरही फिरतात. ड्रोनद्वारे चित्रीकरणात एखाद्या ठिकाणी गोंधळ दिसत असल्यास पोलिस मित्रांनाही बोलावले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates :मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल, नागरिकांच्या घरात शिरलं ड्रेनेजचं पाणी

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT