Here women will get blood at a discounted rate 
सोलापूर

येथे महिलांना मिळेल सवलतीच्या दरात रक्त

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - बार्शीच्या रामभाई शाह रक्तपेढीत महिलांना 50 टक्के सवलतीच्या दरात रक्त मिळणार आहे. महिलांसाठी अशा प्रकारची सवलत देणारी राज्यातील ही एकमेव रक्तपेढी असल्याची माहिती रक्तपेठीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्रातील महिला व बालिकांना आरोग्यदायी जीवन जगता यावे, महिलांविषयी सामाजिक बांधिलकीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 50 टक्के सवलतीच्या दरात रक्तपुरवठा करण्यासाठी नारी शक्ती सन्मान योजना बार्शीच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीने सुरू केली आहे. 

श्री. कुंकूलोळ म्हणाले, रक्तपेढीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती व राज्यपालांनी शाह रक्तपेढीस वेळोवेळी गौरविले आहे. जागतिक स्तरावरील इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सामाजिक संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त एक विधायक व व्यापक समाज उपयोगी उपक्रमांतर्गत नारी शक्ती सन्मान योजना सुरू केली आहे. 

यापूर्वी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीने 58 वर्षे वयाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मागील पाच वर्षापासून 50 टक्के सवलतीच्या दरात रक्तपुरवठा सुरू केला आहे. या योजनेच्या माध्यमातून चार वर्षाच्या काळात रक्तपेढीने ज्येष्ठ नागरिकांना सुमारे 10 हजार 816 रक्त पिशवीचा पुरवठा केला असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी सचिव सुभाष जवळेकर, व्यवस्थापक प्रशांत बुडूख, रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य संतोष सूर्यवंशी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT