corona
corona 
सोलापूर

कोरोनामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बळी पंढरपूर तालुक्‍यात 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या हिटलिस्टवर आतापर्यंत बार्शी तालुका होता. आता बार्शी तालुक्‍याला पंढरपूर तालुक्‍याने मागे टाकले असून सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक 180 मृत्यू एकट्या पंढरपूर तालुक्‍यात झाले आहेत. ग्रामीण भागातील एकूण 30 हजार 772 कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक 6 हजार 141 बाधित एकट्या पंढरपूर तालुक्‍यात आढळले आहेत. 

बार्शी तालुक्‍यातील बाधितांची संख्या 5 हजार 467 तर आता पर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 177 आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 745 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण बार्शी तालुक्‍यात आहेत. बार्शी खालोखाल पंढरपूर तालुक्‍यात 445, माढा तालुक्‍यात 355, मोहोळमध्ये 322 आणि माळशिरस तालुक्‍यात 310 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहेत. 
सोलापूर शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आज 40 हजार 344 वर पोहोचली आहे. त्यातील 36 हजार 23 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

रुग्णालयात सध्या 2 हजार 870 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणीचे 34 अहवाल अद्यापही प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. आजच्या अहवालानुसार नव्या 134 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 95 तर महापालिका हद्दीतील 39 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानूसार कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 6 तर महापालिका हद्दीतील एका व्यक्तीचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT