Red Start 
सोलापूर

हिमालयीन पाहुणा "कंपन' अकलूजमध्ये दाखल ! वाचा या पक्ष्याची वैशिष्ट्ये 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : येथील सयाजीराजे पार्कमध्ये हिमालयातील थिरथिरा अर्थात कंपन पक्षी दाखल झाला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेत तसेच लेह - लडाख येथील मूळ वास्तव्याला असलेला कंपन पक्षी हा कस्तुरिका कुळातील असून, या पक्ष्याला इंग्रजीत "रेड स्टार्ट' असे नाव आहे. या पक्ष्याबाबत पक्षी निरीक्षक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीपासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर - जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांत स्थलांतर करून येतात. 

हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणीच येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात. या पक्ष्यातील वैशिष्ट्य म्हणजे, नर व मादी दोन्हींमधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधित व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्ष्याला कंपन पक्षी असे नाव पडले आहे. या पक्ष्यातील नर - मादीतील फरक सहज ओळखता येतो. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके, पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. हे पक्षी अतिशय चपळ असून कीटक व कोळी टिपण्यासाठी सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडत राहतात. 

कंपन पक्ष्याची जोडी सकाळ व संध्याकाळच्या वेळी सयाजी पार्कमधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्‍य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढविलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणी वर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात. 
- स्वरूपाराणी मोहिते - पाटील, 
सयाजीराजे पार्क, अकलूज 

कंपन पक्षी सयाजीराजे पार्कमध्ये 2009 पासून दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात हमखास येऊन दाखल होतो, हे आमच्या निरीक्षणावरून लक्षात आले आहे. आम्ही सध्या या पक्ष्याच्या खाद्य सवयी, राहणीमान व त्याचा परतीचा प्रवास आदी घटनाक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. 
- ऋतुराज कुंभार, 
पक्षी निरीक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT