Shivparvati 
सोलापूर

कोरोनामुळे अकलूज येथील ऐतिहासिक महाशिवरात्र यात्रा भरणार नाही ! शिवपार्वती मंदिर समितीचा निर्णय

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीचा निर्णय घेण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा न भरविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते - पाटील यांनी दिली. 

यशवंतनगर, अकलूज येथे ऐतिहासिक शिवपार्वती मंदिर असून, दरवर्षी महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर - अकलूज यांच्या विद्यमाने दरवर्षी महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्र यात्रा मोठ्या प्रमाणात भरविण्यात येते. सलग पाच ते सहा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये यात्रेबरोबरच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने, शेती विषयक प्रदर्शने, समारंभ, पीक स्पर्धा, दुग्ध स्पर्धा, उत्कृष्ट जातिवंत जनावरांची व घोड्यांची निवड तसेच विविध बक्षिसांचे वितरण आदि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच कर्मवीर कै. बाबासाहेब माने - पाटील, सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते - पाटील व धर्मवीर कै. सदाशिवराव माने - पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नामांकित पुरुष व महिला मल्लांच्या जंगी निकाली कुस्त्यांच्या फडाचेही आयोजन करण्यात येऊन विजेत्या मल्लांना बक्षीस वितरण करण्यात येते. 

या महाशिवरात्र यात्रा व जंगी निकाली कुस्त्यांकरिता पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन व यात्रेकरिता उपस्थित राहात असल्याने फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी (7 मार्च) ते शुक्रवारी (12 मार्च) या कालावधीमध्ये सालाबादप्रमाणे भरविण्यात येणारी महाशिवरात्र यात्रा न भरविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील यांनी दिली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT