सोलापूर

शिक्षकांची नाराजी, नको रे बाबा! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत घटली आहे. पटसंख्या घटल्याने 2017-18 मध्ये अतिरिक्‍त ठरलेल्या काही शिक्षकांना तात्पुरती नियुक्‍ती दिली आहे. तर उर्वरित शिक्षकांना पटसंख्या वाढवून पद कायम करण्याचा सल्ला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, पटसंख्या घटल्याने अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांची नाराजी निवडणुकीत आपल्याला त्रासदायक ठरू नये, या भीतीने या वर्षीचा सेवक संच न करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळांनी पटसंख्या, शाळांमधील शिक्षकांची माहिती यू-डायस प्रणालीत सप्टेंबरपर्यंत भरावी, असे अपेक्षित आहे. दरम्यान, आरटीईच्या निकषांऐवजी जुन्या नियमांनुसार सेवक संच केला जात असल्याने अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरटीईच्या निकषांनुसार सेवक संच करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील 70 शिक्षक 2017-18 मध्ये अतिरिक्‍त झाले. दोन वर्षांत त्यापैकी 46 शिक्षकांचेच तात्पुरते समायोजन करण्यात आले असून उर्वरित शिक्षकांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या चार हजार 786 शाळा असून त्यापैकी तीन हजार 375 शाळांनीच पटसंख्या अन्‌ शाळांमधील शिक्षकांची माहिती यू-डायस प्रणालीत भरल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली. त्यामुळे या वर्षीचा सेवक संचही लांबणीवर पडेल, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्‍त केली. 

ठळक बाबी..

  • 30 सप्टेंबरनंतरही यू-डायस प्रणालीअंतर्गत पटसंख्या अन्‌ शिक्षकांची माहिती अपूर्णच 
  • सोलापुरातील चार हजार 786 झेडपीच्या शाळांपैकी तीन हजार 375 शाळांनीच भरली माहिती 
  • खासगी प्राथमिक अन्‌ जिल्हा परिषदांच्या शाळांमधील अतिरिक्‍त शिक्षकांना तात्पुरती नियुक्‍ती 
  • पटसंख्या वाढवून पद कायम करण्याचा अतिरिक्‍त शिक्षकांना दिला जातोय सल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal CM News: बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी महिला चेहरा फिक्स? भाजपमध्ये ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा; शपथविधी सोहळा ९ मे रोजी

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

SCROLL FOR NEXT