Home quarantine of 39 students from Kota in Solapur district 
सोलापूर

कोटा येथून सोलापूर जिल्ह्यात आलेले 39 विद्यार्थी होम क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राजस्थानतील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागाच्या बस कोटाकडे गेल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील 39 विद्यार्थी कोटा येथून आले असून या विद्यार्थ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


नीट, जेईई यासह अन्य स्पर्धात्मक परीक्षा व शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी कोटा येथे शिकण्यासाठी जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केल्याने हे विद्यार्थी तेथेच अडकले होते. या मुलांना पुन्हा त्यांच्या त्यांच्या घरी सुखरूप पोच करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात होते. कोटा येथे महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी शिक्षणानिमित्त गेले होते.

या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळच्या 100 बस कोटा  येथे पाठविल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील 39 विद्यार्थी शुक्रवारी (ता. 1) रात्री सोलापूर जिल्ह्यात सुखरूप पोचले आहेत. त्यात सोलापूर शहरातील 14, माढा तालुक्‍यातील 11, माळशिरस तालुक्‍यातील सात, पंढरपूर तालुक्‍यातील दोन, बार्शी तालुक्‍यातील दोन, सांगोला तालुक्‍यातील एक व करमाळा तालुक्‍यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Googleचा नवा AI ‘Gemini 4 Argon’ लॉन्च; कोडिंगपासून सायबरसुरक्षेपर्यंत करणार मदत, जाणून घ्या किंमत

ROHIT SHARMA: ‘पुन्हा तीच भावना अनुभवायची आहे...’; २०२७ वर्ल्ड कपआधी रोहित शर्माचा मोठा खुलासा, शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवरही बोलला

SCROLL FOR NEXT