At the hospital due to the family corona the police served pet animal 
सोलापूर

Video : कुटुंब कोरोनामुळे रूग्णालयात; पोलिसांनी केली मुक्‍या जित्राबांची सेवा 

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (ता. माढा) : कोरोना विषाणुने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. परंतु, त्याही पेक्षा महाभयंकर असा रोग या कोरोनामुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे, तो म्हणजे सेल्फीशपणा. त्यातून हरवलेल्या माणुसकीचे दर्शन दिसत आहे. परंतु, याला अपवाद महाराष्ट्र पोलिस आहेत. संकट कोणतेही असो त्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सदैव तत्पर असतात. याचाच प्रत्यक्ष अनुभव माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रूक येथे पहायला मिळाला आहे. 
एकही रूग्ण नसलेल्या माढा तालुक्‍यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यात नुकतेच माढा तालुक्‍यातील टेंभुर्णीजवळ असलेल्या अकोले बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हे कुटूंब शेती करून आपली उपजीविका भागवत होते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कटपालन, गाई पालन करत होते. अचानक या घरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी हलविले तर संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे व परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. वस्तीवर कुणी नसल्याने जनावरे भुकेने व्याकूळ झाल्याचे बंदोबस्तास असलेल्या पोलिस शिपाई गणेश खोटे, पोलिस हवालदार अजित उबाळे, पोलिस नाईक बालाजी घोळवे, होमगाडे समीर झेंडे, सागर खोचरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने कुणाच्याही मदतीची अपेक्षा न बाळगता स्वतःहून पुढाकार घेत जनावरांना चारा-पाणी दिले. पोलिसांचे कर्तव्य बजावत असताना त्यांनी सामजिक बांधलिकीचे कर्तव्य पार पाडल्याने खाकी वर्दितील माणुसकीचे दर्शन सर्वांना पहायला मिळाले. 
'महाराष्ट्र पोलिस सदैव तत्पर' या ब्रीद वाक्‍याचा खरोखर प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी पहायला मिळाला. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एकीकडे कोरोनाच्या भीतीने सोशल डिस्टन्सचे पालन करणाऱ्या काही लोकांना इतरांचं काहीच देणं घेणं नसताना पोलिसांनी केलेल हे कार्य समाजपुढे एक आदर्श निर्माण करणारे आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT