mohol 
सोलापूर

लॉकडाऊनच्या कालावधीत हॉटेल कामगाराने घेतला गळफास

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : येथील बंद असलेल्या हॉटेलमध्ये हॉटेल कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आल्याची घटना रविवार (ता .३०) ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार येथील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रूची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन बंद होते. हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. यादरम्यान रविवारी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गधी येत असल्याची माहीती पोलीसांना कळविल्यामुळे पोलीस त्या परिसरात गेले असता. हॉटेल रुचीच्या किचनमध्ये लोखंडी अँगलला पडदयाच्या साह्याने गळफास घेऊन सडून खाली पडलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रावरून संबधित इसमाची ओळख पटली असून त्याचे नांव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.

हॉटेल बंद पडल्यानंतर या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण तीन कामगारापैकी दोघेजण ऑनलाईन पास काढून आपआपल्या गावी परत गेले होते. तर मृत कुलदिपसिंग मरावी यानेही ऑनलाईन पास काढत आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न केला असल्याची माहीती मिळाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. बाडीवाले, ढाकणे, व्ही.जी. माने, बोरकर ए.जी, ए.ई. जाधव तपास करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT