Hotgi kaka.jpeg
Hotgi kaka.jpeg 
सोलापूर

होटगीच्या काकाची कुटुंबीयांशी भेट ठरली औट घटकेची 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : मूळचे कुंभार गल्ली, होटगी येथील रहिवासी. पण ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड रस्ता, म्हारळ वरप येथे 15 दिवसांपूर्वी बेवारस स्थितीत एक वृद्ध आढळे होते. काही समाजसेवकांनी त्यांना मदत करुन त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांची ओळखही पटली. कुटुंबीयांशी भेटही झाली. पण त्यांचा जगण्याचा संघर्ष काळाने हिरावून नेला आणि ते मरण पावले. यामुळे कुटुंबीयांशी त्यांची भेट औट घटकेची ठरली. 

शिवाजी धोंडप्पा वाघमारे हे बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती मिळताच माणुसकीच्या नात्याने मदतीला अनेकजण धावून गेले. त्यात अनेकांचा समावेश होते. या सगळ्यांनी त्यांना आंघोळ घातली. बऱ्याच दिवसांपासून रस्त्यावर ते वावरत असल्याने अन्नपाणी त्यांना मिळाले नव्हते. अंगावर ठिकठिकाणी जखमाही झाल्या होत्या. त्यांना अन्नपाणी देऊन जखमेवर मलमपट्टी करण्यात आली. कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून ते वावरत असलेल्या परिसरात सॅनिटायझरची फवारणीही करण्यात आली. एवढ्या प्रयत्नानंतर ते शुद्धीवर आले. अवसान गळाल्याने ते नीट बोलतही नव्हते. कसेबसे त्यांनी आपले नाव व ठावठिकाणा सांगितला. 

त्यांनी दिलेल्या माहितीवर सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल करुन ओळख पटविण्याचा प्रयत्नही झाला. दरम्यान, ही माहिती सोलापूर-होटगीरकर ग्रुपच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाली. त्यानंतर दोनच दिवसांनंतर त्यांची पत्नी, मुलगा विठ्ठल वाघमारे यांच्याशी संपर्क झाला. ते वाहनाने 19 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता त्यांचे परिचित अंबादास यांच्या मदतीने शिवाजी वाघमारे यांना गावीही घेऊन गेले. त्यानंतर त्यांचे निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 


हे धावले मदतीला 
बेवारस स्थितीत ठाणे जिल्ह्यात वावरणाऱ्या वृद्धाची भेट घडवून आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात जलकन्या भक्‍ती जाधव, राजकुमार डांगे, बसवराज पाटील, परशुराम, प्रसाद मोहिते, राकेश पाटील, साईकिरण पालवे, संभव फाउंडेशनचे पदाधिकारी, संजय, सैय्यद भाई, सिद्धेश्‍वर, पोलिस कॉन्स्टेबल राहुल ननवरे, रशिद शेख, अश्‍विन भोईर, वरप, राजेश भोईर, प्रफुल्ल केदारे, जयराम कार्ले, संदीप चोरगे यांचा समावेश आहे. 


भेट घडवून आणल्याचा आनंद 
अनेक सहकार्यामुळे त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर संपर्क साधून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून देण्यात आल्याने फारच आनंद झाला होता. ते घरीही गेले होते. एवढा प्रयत्न करुनही त्यांचे निधन झाल्याचे कळताच दु:ख झाले आहे. 
-भक्‍ती जाधव, जलकन्या 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT