MCP 
सोलापूर

बेरोजगारीवर करा प्रभावी उपाययोजना करा : ऍड. एम. एच. शेख; माकपचे लक्षवेधी आंदोलन 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या वतीने मंगळवारी (ता. 22) कामगार, कष्टकरी व कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे प्रश्न घेऊन देशव्यापी मागणी सप्ताह पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सोलापुरात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव ऍड. शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी मागण्यांचे फलक दाखवून घरोघरी लक्षवेधी आंदोलन मागणी सप्ताह पाळण्यात आले. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात सबंध देशात भूकबळी आणि न भूतो न भविष्यती अशी बेकारीची परिस्थिती उद्भवली. उद्योगधंदे बंद पडले, लोकांची क्रयशक्ती घटली, असे भीषण दारिद्य्र असताना केंद्र आणि राज्य सरकार यावर प्रभावी उपायांची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वांना मोफत रास्त धान्य द्यावे, लॉकडाउन काळातील वीजबिले माफ करावीत, बेरोजगारांना रोजगार द्यावा, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल रद्द करावा, शेतकऱ्यांच्या विरोधातील विधेयक मागे घ्यावे या प्रमुख न्याय्य हक्काच्या मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माकपने मागणी सप्ताहाची हाक दिली, अशी माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड. एम. एच. शेख यांनी घरोघरी लक्षवेधी आंदोलन करताना दिली. 

दत्तनगर येथे माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अनिल वासम, शिवा श्रीराम, किशोर गुंडला, सूरज सोनसळे आदींनी फलक दाखवून सरकारचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT