102Child_Mask_0_20_20Copy_3.jpg 
सोलापूर

तुमच्या तालुक्‍यात किती रुग्ण आढळले? आज ग्रामीणमधील 138 पुरुष आणि 79 महिला कोरोना पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा जोर धरला असून आज तीन हजार 291 संशयितांमध्ये तब्बल 217 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असून त्यात बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा आणि माळशिरस या तालुक्‍यांचा समावेश आहे.

ठळक बाबी... 

  • आज तीन हजार 291 संशयितांमध्ये आढळले 217 पॉझिटिव्ह 
  • आज (रविवारी) 138 पुरुष आणि 79 महिला आढळल्या कोरोना बाधित 
  • सांगोल्यातील वाणीचिंचळ आणि बाशीतील अलिपूर येथील दोघांचा मृत्यू 
  • बार्शी, करमाळा, पंढरपूर, माढा या तालुक्‍यातच आढळले आजही सर्वाधिक रुग्ण 
  • 11 तालुक्‍यातील बाधितांची संख्या आता 42 हजार 682 तर मृतांची संख्या एक हजार 209 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद, नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍ती स्वत:हून टेस्ट करून न घेताच बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याने रुग्ण वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर आता रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून त्या व्यक्‍तींना शोधून काढले जात आहे. त्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आरोग्य सेविकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. संशयितांचे टेस्टिंगही वाढविण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत ग्रामीण भागात 42 हजार 682 रुग्णांपैकी 40 हजार 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या एक हजार 436 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

तालुकानिहाय रुग्ण (कंसात आजचे रुग्ण) 
तालुका             एकूण रूग्ण 
अक्‍कलकोट      1321 (3) 
बार्शी                7437 (68) 
करमाळा           3157 (49) 
माढा                4647 (28) 
माळशिरस        7758 (15) 
मंगळवेढा          1900 (5) 
मोहोळ              2092 (5) 
उत्तर सोलापूर      871 (4) 
पंढरपूर             8501 (31) 
सांगोला             3288 (5) 
दक्षिण सोलापूर   1710 (4) 
एकूण              42,682 (217)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT