‘आदिनाथ’ भाडेतत्त्वावर दिला कसा? sakal news
सोलापूर

‘आदिनाथ’ भाडेतत्त्वावर दिला कसा?

गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेतला अजेंड्यावर विषय

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. ३०) ऑनलाइन होणार आहे. सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असून गेली दीड वर्षापासून हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. या सभेत कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर कशा पध्दतीने चालविण्यास देण्यात आला याची माहिती व आढावा हा विषय टाकण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला २५ वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार करण्यात आला आहे. या प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र अद्यापही कारखाना भाडेतत्त्वावर कशा पध्दतीने चालविण्यास देण्यात आला याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही. विरोधी संचालक व इतर काही सभासदांनी भाडेतत्त्वाचा करार कसा केला यांची माहिती मागूनही तशी माहिती त्यांना मिळालेली नाही.

मात्र ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर विषय क्रमांक ९ हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर कशा पध्दतीने चालविण्यास देण्यात आला याची माहिती व आढावा हा विषय टाकण्यात आला आहे. त्यामुळे या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आदिनाथ कारखाना नेमका कोणत्या कराराने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला, यातून किती पेसे मिळणार? या मिळालेल्या पैशातून कोणाची देणी दिली जाणार? कामगारांच्या पगारीचे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे आदिनाथ कसा भाडेतत्त्वावर दिला हे या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर तालुक्‍यातील जनतेला माहिती होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या थकबाकीपोटी या बॅंकेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार हा कारखाना बारामती ॲग्रोला पंचवीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसा बहुमताने ठराव ही मंजुर करण्यात आला. मात्र एनसीडीसीचे २५ कोटी घेतलेले कर्ज भरले नसल्याने हा कर्जाचा आकडा व्याजासह ४५ कोटीच्या घरात गेला आहे. त्यामुळे एनसीडीसी बॅंक न्यायालयात गेली असून बारामती ॲग्रोला कारखाना देण्याची प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती कोणी सांगायला तयार नाही. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देऊन चालू व्हावा असा बागल गटाचा प्रयत्न आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. चालू हंगामात कारखाना सुरू होऊ शकत नाही. याचा परिणाम तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर निश्‍चितपणे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT